First video : ‘ट्यूबलाइट’च्या टीजरमध्ये ऐकायला मिळणार मुलांचा आवाज!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2017 21:19 IST2017-04-18T15:45:11+5:302017-04-18T21:19:32+5:30

​सगळ्यांनाच माहिती आहे की, अभिनेता सलमान खान लहान मुलांवर किती प्रेम करतोय. कारण सलमान जेव्हा केव्हा मुलांमध्ये मिसळतो तेव्हा तो लहानपणात जात असल्याचे बºयाचदा बघायला मिळाले आहे.

First video: Children's voice will be heard in 'TiLlight' teaser! | First video : ‘ट्यूबलाइट’च्या टीजरमध्ये ऐकायला मिळणार मुलांचा आवाज!!

First video : ‘ट्यूबलाइट’च्या टीजरमध्ये ऐकायला मिळणार मुलांचा आवाज!!

ळ्यांनाच माहिती आहे की, अभिनेता सलमान खान लहान मुलांवर किती प्रेम करतोय. कारण सलमान जेव्हा केव्हा मुलांमध्ये मिसळतो तेव्हा तो लहानपणात जात असल्याचे बºयाचदा बघायला मिळाले आहे. ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटात तर सलमानचे मुन्नीसोबतचे नाते आजही घट्ट असेच आहे. त्यामुळेच मुन्नी आज सगळ्यांची लाडकी बनली आहे. त्याच्या आगामी ‘ट्यूबलाइट’ या चित्रपटात दिग्दर्शक कबीर खान असेच काही तरी करण्याचा प्रयत्न करीत आहे. उपलब्ध माहितीनुसार, ‘ट्यूबलाइट’च्या टीजरमध्ये लहान मुलांचे आवाज ऐकावयास मिळणार आहेत.}}}} ">Eid manao Tubelight ke saath! Follow @TubelightKiEid! #TubelightKiEid@BeingSalmanKhan@kabirkhankk@amarbutalahttps://t.co/3FwZ9vpioz— Kabir Khan (@kabirkhankk) April 18, 2017आज या चित्रपटाचा एक व्हिडिओ रिलीज करण्यात आला आहे. ज्यामध्ये चित्रपट निर्मात्यांनी हे दाखविण्याचा प्रयत्न केला की, आगामी टीजरमध्ये मुलांचे आवाज कशा पद्धतीने ऐकावयास मिळणार आहेत. त्याचबरोबर चित्रपटातील मुख्य भूमिकेचा परिचयही अनोख्या अंदाजात दाखविण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये चित्रपटाचे नाव ‘ट्यूबलाइट’ एका पेटणाºया ट्यूबलाइटच्याच माध्यमातून दाखविण्यात आले आहे. ज्याच्या बॅकग्राउंडमध्ये मुलांचा आवाज दिला आहे. ‘जल जा, जल जा, जल जा!’ अशाप्रकारचा मुलांचा आवाज येत आहे. त्यामुळे चित्रपटाचा टीजर कसा असेल याचा अंदाज बांधणे सहज शक्य होत आहे. 

मुंबई मिररच्या वृत्तनुसार कबिर खानने सांगितले की, ‘सलमान खान आणि मी टीजरसाठी मुलांचा आवाज यूज करण्याविषयी विचार करीत होतो. यासाठी आम्ही ट्रेंड मुलांना घेतले नसून, बिल्डिंगमधीलच मुलांना एकत्र केले. ६ ते ११ वयोगटांतील मुलांना एकत्र करून त्यांचा आवाज या टीजरमध्ये ऐकावयास मिळणार आहे.  



हा निर्णय घेण्यामागचे एकमेव कारण म्हणजे सलमानला मुलांसोबत काम करायला खूप आवडते. कारण सलमानचे मुलांसोबत जे नाते तयार होते, ते मोठ्यांबरोबर फारसे होत नाही. जर आम्ही हजारो लोकांच्या गर्दीत शूटिंग करीत असलो तरी, सलमान त्या गर्दीतून मुलांना बोलावून त्यांच्यासोबत मस्ती करतो. त्यामुळेच ‘बजरंगी भाईजान’मधील मुन्नीचे आजही सलमानसोबतचे नाते खूपच चांगले आहेत. 

Web Title: First video: Children's voice will be heard in 'TiLlight' teaser!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.