पॅडमॅन या चित्रपटाच्या निमित्ताने अक्षय कुमारने पहिल्यांदा स्पर्श केला या गोष्टीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2018 15:40 IST2018-01-15T10:10:09+5:302018-01-15T15:40:09+5:30

बॉलिवूडचा खिलाडी अक्षयकुमार अतिशय हटके अंदाजात आपल्या चाहत्यांना नुकताच पुण्यात भेटला. त्याच्या आगामी ‘पॅडमॅन’ या चित्रपटाच्या माध्यमातून एका महत्त्वपूर्ण ...

The first thing that Akshay Kumar has touched on the occasion of Padman | पॅडमॅन या चित्रपटाच्या निमित्ताने अक्षय कुमारने पहिल्यांदा स्पर्श केला या गोष्टीला

पॅडमॅन या चित्रपटाच्या निमित्ताने अक्षय कुमारने पहिल्यांदा स्पर्श केला या गोष्टीला

लिवूडचा खिलाडी अक्षयकुमार अतिशय हटके अंदाजात आपल्या चाहत्यांना नुकताच पुण्यात भेटला. त्याच्या आगामी ‘पॅडमॅन’ या चित्रपटाच्या माध्यमातून एका महत्त्वपूर्ण विषयावर प्रबोधन करत आहे. मासिक पाळीच्या बाबतीत आपल्या देशात मोकळेपणाने बोलले जात नाही. पण या विषयावर मोकळेपणाने चर्चा करण्याची नितांत गरज आहे. मासिक पाळीत वापरल्या जाणारा सॅनिटरी नॅपकिन बनवणाऱ्या एका अवलियाची गोष्ट प्रेक्षकांना अक्षयच्या पॅडमॅन या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. त्याच्या या चित्रपटाची त्याच्या फॅन्सना प्रचंड प्रतीक्षा असून, अनेकांना चित्रपटातील त्याच्या भूमिकेबद्दल जाणून घेण्याची तीव्र इच्छा आहे. अक्षय कुमारने या चित्रपटाच्या निमितत्ताने नुकतीच लोकमत सखी मंचला उपस्थिती लावली होती. त्याच्यासोबत गप्पा मारण्यासाठी तिथे हजारोने लोक आले होते. अक्षयने तिथे त्याच्या फॅन्ससोबत पॅडमॅन या चित्रपटाबद्दल भरभरून गप्पा मारल्या. आपल्या देशातील ८० टक्के महिलांना पॅड वापरणे परवडत नसल्याने त्या मासिक पाळीच्या काळात झाडाची पानं, जुने कपडे अशा गोष्टी वापरतात आणि त्याचा त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो असे त्याने यावेळी लोकांशी गप्पा मारताना सांगितले.
अक्षय कुमारच्या पॅडमॅन या चित्रपटाची निर्माती ही त्याची पत्नी ट्विंकल खन्ना आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने त्याला मासिक पाळी आणि या काळात वापरण्यात येत असलेल्या सॅनिटरी नॅपकिन विषयी अनेक गोष्टी कळल्या असे त्याने सांगितले. या चित्रपटाच्या निमित्ताने त्याने पहिल्यांदा सॅनिटरी पॅडला हात लावला. याविषयी अक्षय कुमार सांगतो, मी सॅनिटरी पॅडविषयी ऐकले होते. पण कधीच मी सॅनिटरी नॅपकिनला हात लावला नव्हता. पण या चित्रपटाच्या निमित्ताने मी पहिल्यांदाच दीड-दोन वर्षांपूर्वी सॅनिटरी नॅपकिन हातात घेतला. महिलांच्या आरोग्यासाठी त्यांनी सॅनिटरी नॅपकिन वापरणे गरजेचे आहे. त्यामुळे आपल्या देशातील सगळ्या महिलांनी त्यांच्या मासिक पाळीच्या काळात सॅनिटरी नॅपकिन वापरला पाहिजे असे या चित्रपटाद्वारे आम्ही सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
अक्षय कुमारचा पॅडमॅन हा चित्रपट २५ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात सोनम कपूर आणि राधिका आपटे प्रेक्षकांना मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. 

Also Read : अक्षय कुमारने सौंगध नव्हे तर या चित्रपटातून केली होती कारकिर्दीला सुरुवात

Web Title: The first thing that Akshay Kumar has touched on the occasion of Padman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.