'जग्गा जासूस'मधले पहिले साँग लाँच

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2017 14:53 IST2017-06-02T09:15:58+5:302017-06-02T14:53:46+5:30

कॅटरिना कैफ आणि रणबीर कपूर यांच्या आगामी चित्रपट जग्गा जासूसमधले उल्लू का पट्ठा हे गाणे लाँच करण्यात आले आहे.

The first song launch from 'Jagga Detective' | 'जग्गा जासूस'मधले पहिले साँग लाँच

'जग्गा जासूस'मधले पहिले साँग लाँच

लिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि कॅटरिना कैफ यांच्या बहुचर्चित आगामी चित्रपट जग्गा जासूसचे पहिले गाणे लाँच करण्यात आले आहे. 'उल्लू का पट्ठा' असे या गाण्याचे बोल आहेत. गाण्याच्या शब्दांवरुन गाणे मजेशीर असल्याचा अंदाज आपल्याला येतो. हे गाणे तरुणाच्या गळ्यातील ताईत असलेल्या गायक अरजित सिंगने गायले आहे. उल्लू का पट्ठा या गाण्यात कॅटरिना आणि रणबीर फनी पद्धतीने डान्स करताना दिसतायेत. या गाण्यात दोघे थोडीशी अॅक्शन पण करताना दिसतायेत. 


जग्गा जासूस चित्रपट कॅटरिनाच्या वाढदिवसाच्या 2 दिवस आधी रिलीज करण्यात येणार आहे. म्हणजेच 14 जुलैला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आतापर्यंत 7 वेळा या चित्रपटाची रिलीज टेडमध्ये बदल करण्यात आला आहे. रणबीर व कॅटरिनाच्या ब्रेकअपनंतरचा हा त्यांचा पहिला एकत्र केलेला चित्रपट असेल. प्रारंभी या दोघांच्या ब्रेकअपमुळे हा चित्रपट रखडला होता.​ यानंतर  ७ एप्रिलला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार होता. पण काही गाणी आणि काही दृश्यांच्या शूटींगमुळे चित्रपटाची रिलीज डेट लांबणीवर टाकण्यात आली. ब्रेकअपनंतर कॅट व रणबीरची ऑनस्क्रीन केमिस्ट्री पाहण्यास प्रेक्षक उत्सूक आहेत. 

जग्गा जासूस चित्रपटाचे दिग्दर्शन अनुराग बासूने केले आहे. या चित्रपटात रणबीर, कॅटरिनासह गोविंदा, सायानी गुप्ता आणि अदा शर्मासुद्धा दिसणार आहेत.  या चित्रपटात तब्बल २९ गाणी आहेत, या गाण्यांना प्रीतम यांनी संगीत दिले आहे. संगीतप्रेमींसाठी हा चित्रपट म्युझिकल ट्रीट असणार आहे. 

 

Web Title: The first song launch from 'Jagga Detective'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.