First Poster : ‘बहन होगी तेरी’मध्ये राजकुमार राव अन् श्रुती हासनची जमली केमिस्ट्री!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2017 19:41 IST2017-05-04T14:11:04+5:302017-05-04T19:41:04+5:30

राजकुमार राव आणि श्रुती हासन यांचा आगामी ‘बहन होगी तेरी’ या चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरची झलक आम्ही तुम्हाला दाखविणार आहोत. ...

First Poster: 'Sister-in-Teri' Rajkumar Rao and Shruti Hassan's Jamali Chemistry! | First Poster : ‘बहन होगी तेरी’मध्ये राजकुमार राव अन् श्रुती हासनची जमली केमिस्ट्री!

First Poster : ‘बहन होगी तेरी’मध्ये राजकुमार राव अन् श्रुती हासनची जमली केमिस्ट्री!

जकुमार राव आणि श्रुती हासन यांचा आगामी ‘बहन होगी तेरी’ या चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरची झलक आम्ही तुम्हाला दाखविणार आहोत. बॉलिवूड मसाला लव्ह स्टोरीपेक्षा थोड्याशा हटके अंदाजात असलेल्या या चित्रपटाची कथा दोन शेजाºयांच्या प्रेमकथेवर आधारित आहे. सध्या निर्माते या चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज करण्याच्या तयारीत असून, त्याअगोदरच आम्ही तुम्हाला या पोस्टरची झलक दाखवित आहोत. 

सध्या या चित्रपटाबाबत लोकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, याचे संपूर्ण श्रेय चित्रपटाच्या मार्केटिंग स्ट्रेटेजीला जाते. कारण इतर बॉलिवूड चित्रपटांच्या तुलनेत या चित्रपटाची मार्केटिंग अतिशय वेगळ्या पद्धतीने केली जात आहे. निर्मात्यांनी सर्वात अगोदर चित्रपटातील अतिशय एंटरटेनिंग गाणे ‘जय माता’ हे रिलीज करून प्रेक्षकांमध्ये आतुरता निर्माण केली आहे. हे गाणे कॅटरिना कैफ हिच्या सुपरहिट ‘काला चष्मा’ या गाण्याच्या तालावर बनविण्यात आले आहे. त्यानंतर चित्रपटाचे ट्रेलर रिलीज केले गेले. आता लवकरच या चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज केले जाणार असून, त्याअगोदरच आम्ही त्याची झलक तुम्हाला दाखवित आहोत. 

पोस्टर अतिशय मजेदार असून, त्यामधून चित्रपटाची कथा स्पष्टपणे झळकत आहे. पोस्टरमध्ये राजकुमार राव सायकल रिक्षा चालवित असून, श्रुती त्याच्या समोर बसलेली दिसत आहे. दोघेही आपल्याच धूनमध्ये बघावयास मिळत आहेत. चित्रपटाचे निर्माता अमूल विकास मोहनचे म्हणणे आहे की, चित्रपटाने आताच प्रेक्षकांमध्ये स्थान मिळविले आहे. आता आम्ही काहीतरी वेगळे करण्याच्या विचारात आहोत, कारण हा चित्रपट छोटा आहे. आता आम्ही या चित्रपटाविषयी जेवढा प्रचार करू शकतो, तेवढा करण्याचा आमचा विचार आहे. या चित्रपटाविषयी बोलायचे झाल्यास ही एक फ्रेश स्टोरी आहे. 

अजयकुमार पन्नालाल यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात राजकुमार राव, श्रुती हासन, गौतम गुलाटी, गुलशन ग्रोवर, रंजीत आदी कलाकार आहेत. हा चित्रपट येत्या २ जून रोजी रिलीज होणार आहे. 

Web Title: First Poster: 'Sister-in-Teri' Rajkumar Rao and Shruti Hassan's Jamali Chemistry!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.