First Poster Out : दिलजीत दोसांझचा पहा सुपरहिरोवाला अंदाज!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2017 15:56 IST2017-04-22T10:21:41+5:302017-04-22T15:56:30+5:30

बॉलिवूडमध्ये ‘उडता पंजाब’ या चित्रपटातून पाउल ठेवणारा अभिनेता दिलजीत दोसांज आता सुपरहिरोच्या अवतारात बघावयास मिळणार आहे. त्याच्या आगामी ‘सुपर ...

First Poster Out: Look at Diljit Dosanjh's Superhero! | First Poster Out : दिलजीत दोसांझचा पहा सुपरहिरोवाला अंदाज!!

First Poster Out : दिलजीत दोसांझचा पहा सुपरहिरोवाला अंदाज!!

लिवूडमध्ये ‘उडता पंजाब’ या चित्रपटातून पाउल ठेवणारा अभिनेता दिलजीत दोसांज आता सुपरहिरोच्या अवतारात बघावयास मिळणार आहे. त्याच्या आगामी ‘सुपर सिंग’ या चित्रपटात दिलजीत सुपरहिरोची भूमिका साकारत असून, या चित्रपटाचे पहिले पोस्टर नुकतेच रिलीज करण्यात आले आहेत. त्याचबरोबर दिलजीतचा हा पहिलाच सुपरहिरो पंजाबी चित्रपट आहे. या चित्रपटात दिलजीत आतापर्यंतच्या त्याच्या भूमिकेपेक्षा अतिशय हटके भूमिकेत दिसणार आहे. 

याविषयी दिलजीत सांगतो की, माझ्या फॅन्सकडून मला नेहमीच प्रेम मिळाले आहे. माझ्या करिअरमध्ये माझ्या फॅन्सचे खूप योगदान राहिले आहे. ‘सुपर सिंग’ या चित्रपटात मी आतापर्यंतची सर्वांत हटके भूमिका साकारत आहे. मला असे वाटते की, माझ्या फॅन्सला हा चित्रपट आवडणार असून, ते माझ्या भूमिकेविषयी समाधान व्यक्त करतील. 



‘सुपर सिंग’ या चित्रपटाचे दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते अनुराग सिंग यांनी केले आहे. अनुराग सांगतात की, ‘सुपर सिंग’ असे पात्र आहे जे लहान मुले, तरुण आणि वयोवृद्धांना आवडणार. हा चित्रपट केवळ पंजाबी लोकांसाठीच नव्हे तर भारतातील प्रत्येक प्रेक्षकांसाठी आहे. चित्रपटाचे ट्रेलर लवकरच रिलीज केले जाणार असून, दिलजीतचा सुपरहीरो कॉस्टूम लुकचे पोस्टर त्याच्या फॅन्सच्या पसंतीस पडत आहे. 

एकता कपूरच्या बालाजी मोशन पिचर्स तथा अनुराग सिंग आणि पवन गिल यांच्या ब्रॅट फिल्म्स निर्मित ‘सुपर सिंग’ हा चित्रपट १६ जून २०१७ रिलीज होणार आहे. 

Web Title: First Poster Out: Look at Diljit Dosanjh's Superhero!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.