First Poster Out : ‘हेट स्टोरी4’च्या पोस्टरवरील ‘या’ अभिनेत्रीला तुम्ही ओळखता?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2018 14:05 IST2018-01-25T08:31:04+5:302018-01-25T14:05:22+5:30
दिग्दर्शक विशाल पंड्या हिट फ्रेंचाइजी ‘हेट स्टोरी’चा चौथा भाग घेऊन येत आहेत, हे तर आपल्याला ठाऊक आहेच. आज या ...

First Poster Out : ‘हेट स्टोरी4’च्या पोस्टरवरील ‘या’ अभिनेत्रीला तुम्ही ओळखता?
द ग्दर्शक विशाल पंड्या हिट फ्रेंचाइजी ‘हेट स्टोरी’चा चौथा भाग घेऊन येत आहेत, हे तर आपल्याला ठाऊक आहेच. आज या चित्रपटाचे पहिले पोस्टर आऊट झाले. या पोस्टरमध्ये अभिनेत्री उर्वशी रौतेलाचा हॉट अंदाज पाहायला मिळतोय. ‘हेट स्टोरी4’चे हे पोस्टर पाहून चाहतेही उर्वशीला ओळखू शकणार नाहीत. पोस्टर पाहता एक गोष्ट स्पष्ट आहे, ती म्हणजे यात उर्वशी अतिशय बोल्ड अवतारात दिसणार आहे. हे पोस्टर त्याची एक झलक आहे.
![]()
येत्या २७ तारखेला ‘हेट स्टोरी4’चा ट्रेलर रिलीज होणार आहे. पोस्टरसोबत ही माहिती देण्यात आली आहे. शिवाय चित्रपटाची रिलीज डेटही जाहीर करण्यात आली आहे. आधी हा चित्रपट २ मार्चला रिलीज होणार होता. पण आता तो ९ मार्चला रिलीज होणार आहे. उर्वशीसोबत अभिनेता करण वाही यात लीड रोलमध्ये आहे. याशिवाय एक नवा चेहराही या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. होय, पंजाबी अभिनेत्री इहाना ढिल्लन या चित्रपटाद्वारे बॉलिवूड डेब्यू करते आहे. सूरज पांचोली आणि गुरमीत चौधरी यांच्याही यात महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत.
ALSO READ : SEE PICS : हॉट अॅण्ड ग्लॅमरस उर्वशी रौतेला कॉलेज दिवसात दिसायची अशी...!
‘हेट स्टोरी3’मध्ये करण सिंग ग्रोव्हर, शरमन जोशी आणि जरीन खान लीड रोलमध्ये दिसले होते. या चित्रपटाने बॉक्सआॅफिसवर चांगला बिझनेस केला होता. तसेही ‘हेट स्टोरी’ बॉक्सआॅफिसवर एक हिट फ्रेंचाइजी आहे. सस्पेन्स, थ्रील आणि बोल्डनेस असा सगळा मसाला असल्यामुळे ही फ्रेंचाइजी इतकी हिट ठरलीय. ही फ्रेंचाइजी इरोटिक कन्टेन्टसाठी ओळखली जाते. विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘हेट स्टोरी’ने याची सुरुवात झाली होती. यात अभिनेत्री पाऊली डॅम मुख्य भूमिकेत दिसली होती. यानंतर आलेल्या ‘हेट स्टोरी2’मध्ये सुरवीन चावला फिमेल लीडमध्ये होती. तर ‘हेट स्टोरी3’मध्ये जरीन खानने लीड भूमिका साकारली होती. ‘हेट स्टोरी4’मध्ये ही जागा उर्वशीने घेतली आहे. उर्वशीने ‘सिंह साहब द ग्रेट’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूड डेब्यू केला होता. यानंतर ती ‘सनम रे’ आणि ‘ग्रेट ग्रॅण्ड मस्ती’मध्ये दिसली होती. गतवर्षी आलेल्या ‘काबील’मध्ये तिने केलेले आयटम सॉन्ग चांगलेच गाजले होते.