First look out : टायगर श्रॉफचा थक्क करणारा ‘रॅम्बो’चा फर्स्ट लुक रिलीज!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2017 14:14 IST2017-05-20T08:43:53+5:302017-05-20T14:14:08+5:30
अभिनेता टायगर श्रॉफ लवकरच हॉलिवूडचा अॅक्शनपट ‘रॅम्बो’च्या इंडियन रिमेकमध्ये बघावयास मिळणार आहे. या चित्रपटाचा पहिला लुक समोर आला असून, ...
.jpg)
First look out : टायगर श्रॉफचा थक्क करणारा ‘रॅम्बो’चा फर्स्ट लुक रिलीज!
अ िनेता टायगर श्रॉफ लवकरच हॉलिवूडचा अॅक्शनपट ‘रॅम्बो’च्या इंडियन रिमेकमध्ये बघावयास मिळणार आहे. या चित्रपटाचा पहिला लुक समोर आला असून, त्यामध्ये टायगरचा अंदाज बघण्यासारखा आहे. ट्रेड अॅनलिस्ट तरण आदर्शने ट्विटवरून टायगरच्या ‘रॅम्बो’चा पहिला लुक रिलीज केला आहे. सिद्धार्थ आनंद या चित्रपटाचे दिग्दर्शन करीत आहेत. तर ‘एम कॅपिटल वेंचर्स, ओरिजनल एन्टरटेन्मेंट, इम्पॅक्ट फिल्म आणि सिद्धार्थ आनंद पिक्चर्स’ या चित्रपटाचे निर्मिती करीत आहेत.
टायगर सुरुवातीपासूनच या चित्रपटासाठी उत्सुक होता. मात्र त्याने हेही स्पष्ट केले होते की, तो हॉलिवूड अभिनेता सिलवेस्टर स्टेलॉनला कधीच फाइट देऊ शकणार नाही. ‘रॅम्बो’च्या या फोटोचे जर बारकाईने निरीक्षण केल्यास, टायगर फोटोत खूपच रागात असल्याचे दिसत आहे. या चित्रपटात बरेचसे इंडियन ट्विस्ट दाखविण्यात येणार आहेत. त्यामुळे टायगरचा हा फस्ट लुक दिमाखदार आहे, यात काहीही शंका नाही. शिवाय त्याचा हा लुक हॉलिवूडच्या ‘रॅम्बो’ या चित्रपटाशीही बºयापैकी मिळता-जुळता आहे. असो हे पोस्टर रिलीज करताच सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हा चित्रपट मिळाल्यानंतर टायगरने आयएएनएस या न्यूज एजन्सीला सांगितले होते की, ‘मी लहानपणापासून मार्शल आटर््स आणि अॅक्शन चित्रपटांचा चाहता आहे. त्यामुळे माझ्यासाठी ही खूप मोठी संधी आहे. मात्र मी दिग्गज सिलवेस्टर स्टॅलोनची जागा कधीच घेऊ शकणार नाही. मला लहानपणापासून या सिरीजची ओढ असल्याने त्यास मी भरपूर मेहनत करण्यास तयार आहे.’ आता टायगरची मेहनत कितपत सार्थकी ठरेल हे येत्या काळात स्पष्ट होईलच.

}}}} ">Tiger Shroff is #Rambo... Directed by Siddharth Anand... #RamboRemakepic.twitter.com/S89Z0Q9bFx— taran adarsh (@taran_adarsh) May 20, 2017‘रॅम्बो’ हा चित्रपट डेविड मॉरेल यांच्या ‘फर्स्ट ब्लड’ या कादंबरीवर आधारित आहे. या कादंबरीवर हॉलिवूडमध्ये एका सिरीजचीच निर्मिती करण्यात आली आहे. ज्यामध्ये अभिनेता सिलवेस्टर स्टॅलोन याने जॉन रॅम्बोची भूमिका साकारली आहे. सिलवेस्टर स्टॅलोनच्या या इंडियन अवतारासाठी सुरुवातीला हृतिक रोशनपासून ते सिद्धार्थ मल्होत्रा या अभिनेत्यांची नावे समोर आली होती. मात्र अखेरीस टायगर श्रॉफच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. खरं तर टायगरने आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये दमदार अॅक्शन केली आहे. त्यामुळे तो या चित्रपटासाठी अगदीच फिट बसतो, असे जाणकारांचे म्हणणे आहे.
Tiger Shroff is #Rambo... Directed by Siddharth Anand... #RamboRemakepic.twitter.com/S89Z0Q9bFx— taran adarsh (@taran_adarsh) May 20, 2017