धनुषच्या पहिल्या हॉलिवूड चित्रपटाचे फर्स्ट लूक आऊट! तुम्हीही पाहा!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2017 12:48 IST2017-11-02T06:30:59+5:302017-11-02T12:48:30+5:30

साऊथ सुपरस्टार धनुष सध्या कुठे बिझी आहे तर हॉलिवूडमध्ये. होय, महानायक रजनीकांत यांचा जावई धनुष आता टॉलिवूड आणि बॉलिवूडनंतर ...

First look out of the first Hollywood movie of Dhanush! You see too !! | धनुषच्या पहिल्या हॉलिवूड चित्रपटाचे फर्स्ट लूक आऊट! तुम्हीही पाहा!!

धनुषच्या पहिल्या हॉलिवूड चित्रपटाचे फर्स्ट लूक आऊट! तुम्हीही पाहा!!

ऊथ सुपरस्टार धनुष सध्या कुठे बिझी आहे तर हॉलिवूडमध्ये. होय, महानायक रजनीकांत यांचा जावई धनुष आता टॉलिवूड आणि बॉलिवूडनंतर हॉलिवूडमध्ये कमाल दाखवण्यासाठी सज्ज झालाय. त्याच्या पहिल्या-वहिल्या हॉलिवूड चित्रपटाचा फर्स्ट लूक सगळ्यांसमोर आला आहे.
‘रांझणा’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा धनुष आता ‘द एक्स्ट्राआॅर्डिनरी जर्नी आॅफ द फकीर’ या चित्रपटाद्वारे हॉलिवूडमध्ये पदार्पण करतोय. केन स्कॉट दिग्दर्शित या चित्रपटाचे पहिले पोस्टर आज आऊट झाले. यात धनुष निळ्या रंगाच्या कोटमध्ये दिसतोय.
त्याच्यासोबत फ्रेंच अभिनेत्री बेरेनाइस बेजो दिसतेय. 



‘द एक्स्ट्राआॅर्डिनरी जर्नी आॅफ द फकीर’ हा चित्रपट एका भारतीय मुलाच्या असामान्य प्रवासावर आधारित आहे. या चित्रपटात एरिन मोरियार्टी, सराह जेने लेब्रोससारखे अनेक दिग्गज कलाकार आहेत. हा चित्रपट रोमेन पोर्टलसच्या ‘The Extraordinary Journey of the Fakir Who Got Trapped in an Ikea Wardrobe’ या कादंबरीवर बेतलेला आहे. ही कादंबरी २०१४ मध्ये प्रकाशित झाली होती. आत्तापर्यंत ३५ भाषांमध्ये तिचे भाषांतर झाले आहे. आपल्या पित्याच्या शोधात निघालेल्या एका भारतीय मुलाची कथा यात सांगितली गेली आहे. पॅरिस, रोम, बुसेल्ससह भारतात अनेक ठिकाणी या चित्रपटाचे शूटींग झालेय. 
तूतार्स  ‘द एक्स्ट्राआॅर्डिनरी जर्नी आॅफ द फकीर’ या चित्रपटाचे दिग्दर्शक केन स्कॉट धनुषची तारीफ करताना थकत नाहीयेत. धनुष हा एक महान कलाकार आहे आणि इतक्या महान कलाकारासोबत काम करणे एक महान अनुभव आहे. धनुष केवळ महान अभिनेताच नाही तर तितकाच महान डान्सर आणि सिंगरही आहे. तो सर्वांपेक्षा वेगळा आहे आणि म्हणून त्याच्यासोबत काम करताना मज्जा आली, असे केन यांनी म्हटले आहे.

ALSO READ: paternity case : सिद्ध झाले कुणाचा मुलगा आहे धनुष; जिंकला खटला!

याचवर्षी धनुष आपला पहिला चित्रपट दिग्दर्शित करणार आहे. ‘पॉवर पांडी’ हा चित्रपट धनुष दिग्दर्शित करतोय. एकंदर काय तर धनुषला हे वर्षे चांगलेच भरभराटीचे लागलेयं. हॉलिवूड प्रोजेक्टसोबत डायरेक्शन डेब्यू असे नवे काही करण्याची संधी यावर्षात त्याला मिळाली आहे.

Web Title: First look out of the first Hollywood movie of Dhanush! You see too !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.