Nawazuddin Siddiqui की अर्चना पुरन सिंग? 'Haddi'चित्रपटातील अभिनेत्याचा लुक्स पाहून चाहते सैराट!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2022 04:50 PM2022-08-23T16:50:29+5:302022-08-23T16:51:05+5:30

Nawazuddin Siddiqui- नवाझुद्दीन सिद्दीकी हा विविधरंगी भूमिका करणारा नट म्हणून ओळखला जातो.. आपल्या अभिनयाची छाप त्याने प्रेक्षकांच्या मनावर पाडली आहे.

First Look: Nawazuddin Siddiqui in never-seen-before avatar for Zee Studios' noir revenge drama 'Haddi' | Nawazuddin Siddiqui की अर्चना पुरन सिंग? 'Haddi'चित्रपटातील अभिनेत्याचा लुक्स पाहून चाहते सैराट!

Nawazuddin Siddiqui की अर्चना पुरन सिंग? 'Haddi'चित्रपटातील अभिनेत्याचा लुक्स पाहून चाहते सैराट!

googlenewsNext

Nawazuddin Siddiqui- नवाझुद्दीन सिद्दीकी हा विविधरंगी भूमिका करणारा नट म्हणून ओळखला जातो.. आपल्या अभिनयाची छाप त्याने प्रेक्षकांच्या मनावर पाडली आहे. त्याने काम केलेल्या तलाश, कहानी, गँग ऑफ वासेपूर, देश इंडियन सर्कल आदी चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कारही मिळाले आहेत. त्याच्या प्रत्येक भूमिकेत काहीतरी नवीन असते आणि तेच प्रेक्षकांना अधिक भावते. आताची त्याच्या 'Haddi'या आगामी चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. आज या चित्रपटाचा पहिला पोस्टर लाँच करण्यात आला आणि नवाझुद्दीन सिद्दीकीचा लूक पाहून प्रेक्षक सैराट झाले आहेत.

नवाझुद्दीन सिद्दीकीने इंस्ट्राग्रामवर हड्डीचा टीझर पोस्ट केला आहे. हा चित्रपट सूड नाटकावर आधारीत आहे आणि त्यामुळे प्रेक्षकांना भरपूर थ्रिल अनुभवायला मिळेल यात शंका नाही.  आज रिलीज झालेल्या शॉर्ट क्लिपमध्ये नवाझुद्दीन सिद्दीकी ग्लॅमरस महिलेच्या रुपात प्रेक्षकांसमोर आला. सुरुवातीला अनेकांना ही महिला अर्चना पुरनसिंग असल्याचा भास झाला. पण, हा नवाझुद्दीन असल्याचे समजताच प्रेक्षक अवाक् झाले आहेत. सोशल मीडियावर Nawazuddin Siddiqui व Haddi हा ट्रेंड सुरू झाला आहे.

पुढील वर्षी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नवाझुद्दीन सिद्धीकीने या टिझरवर लिहीले आहे की, गुन्हा यापूर्वी कधीही इतका सुंदर दिसला नसेल. सूड नाट्य असलेला या चित्रपटात माझा कधी न पाहिलेला अवतार... शुटींगला सुरुवात झाली आहे आणि 2023मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहोत.  

View this post on Instagram

A post shared by Zee Studios (@zeestudiosofficial)

या भूमिकेविषयी नवाझुद्दीनने सांगितले की, मी वेगवेगळी मनोरंजक पात्रे साकारली आहेत, पण 'Haddi'एक वेगळी आणि खास असणार आहे. कारण कधीही न पाहिलेल्या रुपात तुम्ही मला पाहाणार आहात.  एक अभिनेता म्हणून मला पुढे नेणारी ही भूमिका आहे. चित्रपटाचे शूटिंग सुरू करण्यासाठी उत्सुक आहे. 

आनंदिता स्टुडियो, झी स्टुडियोची निर्मिती असलेल्या 'Haddi'चं दिग्दर्शन  अक्षत अजय शर्मा यांनी के आहे. अक्षत अजय शर्मा व अदम्या भल्ला यांनी याचे लेखन केले आहे.  

 आहे.  
 

Web Title: First Look: Nawazuddin Siddiqui in never-seen-before avatar for Zee Studios' noir revenge drama 'Haddi'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.