'द एक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर'चा फर्स्ट लूक लाँच

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2017 15:01 IST2017-06-07T09:31:15+5:302017-06-07T15:01:15+5:30

'द एक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर' या संजय बारु यांच्या पुस्तकावर आधारित चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच करण्यात आले आहे. याचित्रपटात जेष्ठ ...

First Look Launch of The Accidental Prime Minister | 'द एक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर'चा फर्स्ट लूक लाँच

'द एक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर'चा फर्स्ट लूक लाँच

'
;द एक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर' या संजय बारु यांच्या पुस्तकावर आधारित चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच करण्यात आले आहे. याचित्रपटात जेष्ठ अभिनेते अनुपम खेर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भूमिका साकारणार आहेत. 

अनुपम खेर यांनी आपल्या ट्विटर अकांऊटवरुन हे पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये अनुपम खेर हे हुबेहुब मनमोहन सिंग यांच्यासारखे दिसतायेत. या पोस्टरमध्ये त्यांच्यासोबत एक महिला सुद्धा दिसत आहे. त्या सोनिया गांधी असव्यात असा अंदाज लावण्यात येतो आहे.  चित्रपटात सोनिया गांधी यांची भूमिका कोण साकराणार यावरुन अजून तरी पडदा उठलेला नाहीयं. द एक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर पुस्तकाचे लेखक संजय बारु हे मनमोहन सिंग पंतप्रधान असताना 2004 ते 2008 या कालावधीत पीएमओ ऑफिसमध्ये कार्यरत होते. द एक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर हे पुस्तक 2014साली बाजारात आले होते. हे पुस्तक आल्यानंतर काँग्रेसमध्ये वादळ उभे राहिले होते. काँग्रेसकडून हे पुस्तक काल्पनिक असल्याचे सांगण्यात आले होते. या पुस्तकावरील चित्रपट 2019 च्या निवडणुकींच्या आधी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे त्यामुळे चित्रपटानंतर पुन्हा एकदा वादंग निर्माण होणार का असे प्रश्न उपस्थित होतो. 



अनुपम खेर यांनी आपण मनमोहन सिंग यांची भूमिका मोठ्या पडद्यावर साकरण्यासाठी आपण तयार असल्याचे सांगितले होते. राष्ट्रीय पुरस्कार विजेता हंसल मेहता यांनी चित्रपटाची पटकथा लिहिली आहे. विजय रत्नाकर गट्टे हे या चित्रपटाच्या माध्यामातून आपल्या दिग्दर्शनच्या नव्या इनिंगला सुरुवात करणार आहेत. मात्र अजून उर्वरित स्टारकास्ट फायनल होणे बाकी आहे. त्यासाठीचे ऑडिशन शेवटच्या टप्प्यात अाले असल्याचे चित्रपटाच्या निर्मात्यांने सांगितले आहे.     

Web Title: First Look Launch of The Accidental Prime Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.