Video: पंजाबी गाण्यांवर डान्स अन् रॉयल एन्ट्री..; तापसी पन्नूच्या लग्नाचा व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2024 03:55 PM2024-04-03T15:55:21+5:302024-04-03T15:56:24+5:30

तापसी पन्नूच्या लग्नाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. तापसी आणि तिचा पती मॅथियसचा अनोखा अंदाज लग्नाच्या व्हिडीओत पाहायला मिळतोय. तुम्हीही बघा

FIRST glimpse of Taapsee Pannu and Mathias Boe wedding video viral | Video: पंजाबी गाण्यांवर डान्स अन् रॉयल एन्ट्री..; तापसी पन्नूच्या लग्नाचा व्हिडीओ व्हायरल

Video: पंजाबी गाण्यांवर डान्स अन् रॉयल एन्ट्री..; तापसी पन्नूच्या लग्नाचा व्हिडीओ व्हायरल

अभिनेत्री तापसी पन्नूने काही दिवसांपुर्वी तिचा बॉयफ्रेंड मॅथियस बे सोबत लग्न केल्याची बातमी समोर आली. तापसीच्या लग्नाबद्दल बातम्या जरी आल्या असल्या तरीही लग्नाचे एकही फोटो आणि व्हिडीओ समोर आला नाही. परंतु नुकताच तापसी आणि मॅथियस यांच्या लग्नाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या व्हिडीओत तापसी धम्माल करताना दिसतेय.

उदयपूरला तापसी आणि मॅथियस यांनी शाही थाटात एकमेकांशी लग्न केलं. व्हिडीओत पाहायला मिळतंय तापसीने पारंपरिक लेहंगा परिधान करुन लग्नाच्या स्थळी थाटात एन्ट्री घेतली. लाल रंगाचा ड्रेस, लाल रंगाचा चुडा, काळा चष्मा अशा खास अंदाजात तापसीने नववधू म्हणून एन्ट्री घेतली. 'इथ्थे प्यार की पूछ होई ना, तेरे नाल नय्यो बोलना, तेरे मुँह ते मुछ कोई ना', या पंजाबी गाण्याच्या बीटवर तापसीने डान्स केला.

पुढे स्टेजवर जाताना तापसीने मॅथियसचा हात पकडला. मॅथियसने सुद्धा अस्सल पारंपरिक पोशाख परिधान केला होता. रॉयल शेरवानी मॅथियसने परिधान केली होती. लग्नस्थळी येताच तापसी आणि मॅथियस यांनी एकमेकांना मिठी मारली. पुढे पाहुण्यांनी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव केला. एकमेकांना हार घातल्यावर तापसी - मॅथियस दोघांनीही पंजाबी गाण्यावर डान्स केला. तापसीच्या लग्नाचा हा जबरदस्त व्हिडीओ पाहून सर्वांनी तिचं कौतुक आणि अभिनंदन केलंय. 

Web Title: FIRST glimpse of Taapsee Pannu and Mathias Boe wedding video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.