first dialogue promo of ADHM: ‘बॉयफ्रेन्ड ना, फिल्मों की तरह होते है...’
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2016 16:08 IST2016-10-17T16:08:57+5:302016-10-17T16:08:57+5:30
बहुप्रतिक्षीत ‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटाचा पहिला डायलॉग प्रमो आज रिलीज झाला.

first dialogue promo of ADHM: ‘बॉयफ्रेन्ड ना, फिल्मों की तरह होते है...’
ब ुप्रतिक्षीत ‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटाचा पहिला डायलॉग प्रमो आज रिलीज झाला. हा प्रमो पाहिल्यानंतर तुमच्या ओठी हसू उमलल्याशिवाय राहणार नाही. या प्रमोमध्ये रणबीर कपूर आणि अनुष्का शर्मा परस्परांशी संवाद साधताना दिसतात. ‘बॉयफ्रेन्ड ना फिल्मों की तरह होते है, कुछ टाईमपास, कुछ ब्लॉकबस्टर्स...’,‘मदर तो इंडिया होती है, तुम्हारी तो मिल्खा निकली...’ असे यातील विनोदी संवाद तुम्हाला खळखळून हसवतील. शिवाय या चित्रपटाबद्दलची तुमची उत्सूकताही वाढवतील. या प्रमोमध्ये अनुष्का व रणबीरची केमिस्ट्री चांगलीच जमून आल्याचे दिसतेय. अर्थात ऐश्वर्या या प्रमोत गायब आहे. आता ऐश्वर्याशिवाय हा प्रमो तुमच्या मनाला किती भावतो, ते बघा तर!!