...अखेर शाहरूख खानने रणबीर कपूरच्या पाच हजार रुपयांची केली परतफेड!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2017 20:58 IST2017-06-17T15:19:19+5:302017-06-17T20:58:35+5:30

अखेर अभिनेता रणबीर कपूर याला त्याचा अधिकार मिळाला आहे. कारण बॉलिवूडचा किंग शाहरूख खानने मान्य केले की, त्याच्या आगामी ...

Finally, Shah Rukh Khan paid Rs 5000 for Ranbir Kapoor! | ...अखेर शाहरूख खानने रणबीर कपूरच्या पाच हजार रुपयांची केली परतफेड!

...अखेर शाहरूख खानने रणबीर कपूरच्या पाच हजार रुपयांची केली परतफेड!

ेर अभिनेता रणबीर कपूर याला त्याचा अधिकार मिळाला आहे. कारण बॉलिवूडचा किंग शाहरूख खानने मान्य केले की, त्याच्या आगामी चित्रपटाचे टायटल बॉलिवूडच्या याच बर्फी बॉयने सुचविले आहे. शाहरूखने काही वेळापूर्वीच त्याच्या ट्विटर अकाउंटवरून एक फोटो पोस्ट शेअर केली असून, त्यामध्ये तो रणबीरला पाच हजार रुपये देताना दिसत आहे. हा फोटो शेअर करताना किंग खानने लिहिले की, ‘जग्गा जासूस आपला हिशेब बरोबर झाला. यातील हिस्सा करण जोहर यालाही देऊन टाक. कारण ‘जब हॅरी मेट सेजल’मधील ‘जब’ हा शब्द करणने सुचविला आहे.’ 

होय, रणबीरला पाच हजार रुपये देण्यास नकार देणाºया शाहरूख खानने अखेर त्याच्या पैशांची परतफेड केली आहे. ज्यास रणबीर पात्र होता. यावेळी शाहरूखने त्याच्या ट्विटरवरून एक खुलासाही केला की, त्याच्या नव्या चित्रपटाचे नाव सुचविण्यात करण जोहरचेही योगदान राहिले आहे. दरम्यान, फोटोमध्ये शाहरूखकडून पैसे स्वीकारताना रणबीर खूपच आनंदी दिसत आहे. त्याच्या चेहºयावरील आनंद बघण्यासारखा आहे. तर शाहरूख खान याच्या चेहºयावरील हतबलताही तेवढ्याच प्रमाणात बघावयास मिळत आहे. }}}} ">Jagga Jasoos we r quits now!!! Hisaab barabar. Give @karanjohar his share for the ‘Jab’ part in JHMS please. pic.twitter.com/gPtrUdwedD— Shah Rukh Khan (@iamsrk) June 17, 2017रणबीरच्या आगामी ‘जग्गा जासूस’ या चित्रपटाच्या प्रमोशनल इव्हेंटप्रसंगी रणबीर कपूरने खुलासा केला होता की, त्यानेच शाहरूखच्या आगामी चित्रपटाच्या टायटलचे नाव सुचविले आहे. रणबीरने म्हटले होते की, ‘जेव्हा मी शाहरूखला हे टायटल सुचविले होते तेव्हा लोक माझ्यावर हसत होते. लोकांच्या मते हे टायटल बकवास आहे. आज जेव्हा चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले तेव्हा मी बघितले की, मी सजेस्ट केलेलेच टायटल चित्रपटाला दिले गेले आहे. हे बघून मी खूप आनंदी झालो आहे. ज्यादिवशी मी हे टायटल सुचविले होते तेव्हा मी मेहबूब स्टूडिओमध्ये शूटिंग करीत होतो. शाहरूख सर आणि इम्तियाजदेखील तिथेच होते. तेव्हा मी त्यांना भेटण्यासाठी गेलो. चर्चा करीत असताना मी त्यांना हे टायटल सुचविले होते.’ मी या चित्रपटासाठी प्रेक्षकांप्रमाणेच आतुर असल्याचेही रणबीरने म्हटले आहे. 

रणबीरच्या या खुलाशानंतर त्याला, शाहरूखने याबाबत तुला बक्षीस देण्यास नकार दिल्याचे सांगितले होते तेव्हा रणबीरने म्हटले होते की, ‘त्यावेळी मला या बक्षिसाविषयी माहीत नव्हते. आता मला याविषयी माहिती झाले असून, बक्षीस घेण्यासाठी मी मन्नतवर जाणार असून, शाहरूख सरांना पाच हजार रुपये मागणार आहे.’ असो, शाहरूखने रणबीरला त्याचे बक्षीस दिले असून, आपला पराभव झाल्याचे मान्य केले आहे. 

Web Title: Finally, Shah Rukh Khan paid Rs 5000 for Ranbir Kapoor!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.