अखेर ‘रेस3’ला हिरो मिळाला! इमरान हाश्मी देणार सलमान खानला टक्कर!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2017 11:12 IST2017-10-03T05:42:45+5:302017-10-03T11:12:45+5:30

नाही म्हणायला ‘रेस3’चे शूटींग सुरू व्हायचे आहे. पण त्याआधीच हा चित्रपट चर्चेत आहे. या चित्रपटासाठी  सलमान खान, जॅकलिन फर्नांडिस ...

Finally, Race3 got a hero! Imran Hashmi to play Salman Khan | अखेर ‘रेस3’ला हिरो मिळाला! इमरान हाश्मी देणार सलमान खानला टक्कर!!

अखेर ‘रेस3’ला हिरो मिळाला! इमरान हाश्मी देणार सलमान खानला टक्कर!!

ही म्हणायला ‘रेस3’चे शूटींग सुरू व्हायचे आहे. पण त्याआधीच हा चित्रपट चर्चेत आहे. या चित्रपटासाठी  सलमान खान, जॅकलिन फर्नांडिस आणि डेजी शाह या तिघांची वर्णी लागली आहे. तर उर्वरित स्टारकास्टचा शोध सुरु आहे.   या चित्रपटातील एक महत्त्वपूर्ण भूमिका सिद्धार्थ मल्होत्राला आॅफर झाल्याची चर्चा अलीकडे होती. पण सिद्धार्थने म्हणे ही भूमिका नाकारली. त्यानंतर या भूमिकेसाठी आदित्य राय कपूर याच्या नावाची चर्चा रंगली. पण कदाचित इथेही गोष्ट जमली नाही आणि आता ही भूमिका इमरान हाश्मीच्या पदरात पडल्याची बातमी आलीय. होय, डीएनएने दिलेल्या बातमीनुसार,  ‘रेस3’मधील सलमानच्या तोडीच्या भूमिकेसाठी मेकर्स  हिरोच्या शोधात होते. अखेर हा शोध  इमरानपर्यंत येऊन थांबलाय. त्यामुळे आता इमरान ‘रेस3’मध्ये सिद्धार्थ व आदित्यने नाकारलेली भूमिका करताना दिसेल. या चित्रपटात इमरान व डेजी शाहचा आॅनस्क्रीन रोमान्स आपण पाहू शकू.



ALSO READ : स्टारडम धोक्यात ​पाहून सलमान खान झाला ‘अलर्ट’! जावयाच्या चित्रपटाला कळवला नकार!!

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इमरानला दोन हिरो असलेल्या चित्रपटांबद्दल काहीही अडचण नाही. यापूर्वी तो अजय देवगणसोबत ‘वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई’ आणि ‘बादशाहो’मध्ये काम करुन चुकलाय. आता इमरान सलमान खानसोबत स्क्रिन शेअर करणार आहे. खरे तर यापूर्वीही इमरान व सलमानची जोडी बनता बनता राहिली होती. दोघेही एकत्र येणार, अशी मध्यंतरी बातमी होती. पण कदाचित तो योग चुकला. पण आता सलमान व इमरान या दोघांना एकत्र पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे.
सिद्धार्थ मल्होत्राला म्हणे, ‘रेस3’मधील आॅफर झालेली भूमिका आवडली नव्हती. पण भूमिका इतकी वाईट असती तर इमरानने ती कदापि स्वीकारली नसती. साहजिक इमरानने ही भूमिका स्वीकारल्यानंतर त्याबद्दलची चर्चाही रंगलीय. सिद्धार्थने हा चित्रपट का नाकारला? असा प्रश्न यानिमित्ताने विचारला जातोय. कदाचित कारण काही वेगळेच आहे आणि सिद्धार्थ सांगतो काही वेगळेच आहे. असो...आता जर तर करण्यात तसाही अर्थ नाही. कारण आता ‘रेस3’ला दुसरा हिरो मिळाला आहे. इमरान व सलमानला एकत्र पाहणे आमच्यासाठी इंटरेस्टिंग असणार आहेच. तुमच्यासाठी??

Web Title: Finally, Race3 got a hero! Imran Hashmi to play Salman Khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.