​अखेर ‘बच्चन’ आडनावर बोलला अभिषेक बच्चन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2017 15:14 IST2017-02-07T09:44:39+5:302017-02-07T15:14:39+5:30

अलीकडे अभिषेक बच्चनने आपला वाढदिवस साजरा केला. अभिषेकच्या वाढदिवशी अमिताभ बच्चन यांनी त्याला अगदी अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या होत्या. ...

Finally Abhishek Bachchan talked on 'Bachchan'! | ​अखेर ‘बच्चन’ आडनावर बोलला अभिषेक बच्चन!

​अखेर ‘बच्चन’ आडनावर बोलला अभिषेक बच्चन!

ीकडे अभिषेक बच्चनने आपला वाढदिवस साजरा केला. अभिषेकच्या वाढदिवशी अमिताभ बच्चन यांनी त्याला अगदी अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या होत्या. आपल्या twitter हँडलवर अमिताभ यांनी अभिषेकचे वेगवेगळे फोटो शेअर केले होते. शिवाय एका ब्लॉगमध्ये त्याच्याबद्दलच्या भावनाही व्यक्त केल्या होत्या. अभिषेकच्या अपयशी करिअरबद्दलचे दु:ख जणू अप्रत्यक्षपणे अमिताभ यांनी बोलून दाखवले होते.  मी ‘बच्चन’ या आडनावासोबत जन्मलो आणि ‘बच्चन’चे स्पेलिंग येण्याआधीच एक सेलिब्रिटी बनलो. अभिषेकचा जन्मही अमिताभ बच्चनचा मुलगा म्हणून झाला. माझ्यासारखाच तोही या शब्दांचा अर्थ जाणण्याआधीच एक सेलिब्रिटी बनला, असे अमिताभ यांनी या ब्लॉगमध्ये लिहिले होते. या ब्लॉगनंतर साहजिक ‘बच्चन’ हे आडनाव ट्रेडिंगमध्ये आले. अभिषेक ‘बच्चन’ आडनावाच्या ओझ्याखाली दबलाय, असा या ब्लॉगचा अर्थ काढल्या गेल्या. मग यावरून वेगवेगळ्या चर्चांना ऊत आला. पण अभिषेकने या संपूर्ण एपिसोडवर शांत राहणेच पसंत केले. मात्र कदाचित फारकाळ शांत राहणे त्याला शक्य झाले नसावे.

ALSO READ : - म्हणून तुटला करिश्मा कपूर व अभिषेक बच्चनचा साखरपुडा?
SHOCKING : पती अभिषेक बच्चनसाठी ऐश्वर्या रॉय बच्चनने दिला तिच्या करिअरला ‘ब्रेक’?

अलीकडे एका इव्हेंटमध्ये अभिषेकला याबद्दल छेडण्यात आले. मग काय, अभिषेकने यावर अगदी ‘प्रोफेशनल’ खुलासा दिला. पप्पांनी लिहिलेल्या ब्लॉगचा चुकीचा अर्थ काढला गेला. मी ‘बच्चन’ या आडनावाच्या ओझ्याखाली दबलोय, असे म्हणणे चुकीचे आहे. असे पप्पांनी अजिबात लिहिलेले नाही, असे अभिषेकने स्पष्ट केले.
अभिषेकच्या बोलण्यात तसा ‘दम’ तर आहेच. कारण ‘बच्चन’ या आडनावासह त्याने कायम स्वत:ला स्वबळावर सिद्ध करण्याचाच प्रयत्न केलाय. यासाठी प्रसंगी टीकाही सहन केली आहे. फिल्मी करिअरमध्ये अभिषेकच्या वाट्याला यशापेक्षा अपयशच अधिक आले. पण अभिषेक तरिही संघर्ष करतोय. शेवटी हेही नसे थोडके!

वाचा: अमिताभ बच्चन यांनी अभिषेकच्या वाढदिवशी लिहिलेला ब्लॉग जशाचा तसा.



 



 

Web Title: Finally Abhishek Bachchan talked on 'Bachchan'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.