हिराणी बनवताहेत संजूबाबावर चित्रपट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2016 04:10 IST2016-01-16T01:15:33+5:302016-02-13T04:10:11+5:30

दिग्दर्शक राजकुमार हिराणी सध्या एका चित्रपटाच्या कामात व्यस्त आहेत. ते संजय दत्तच्या आयुष्यावर चित्रपट तयार करीत आहेत. संजय दत्तवर तयार होणारी ...

Filmmaker on Sanjubaba making Hirani | हिराणी बनवताहेत संजूबाबावर चित्रपट

हिराणी बनवताहेत संजूबाबावर चित्रपट


/>दिग्दर्शक राजकुमार हिराणी सध्या एका चित्रपटाच्या कामात व्यस्त आहेत. ते संजय दत्तच्या आयुष्यावर चित्रपट तयार करीत आहेत. संजय दत्तवर तयार होणारी फिल्म भावनिक आणि मनोरंजक, असेल असे त्यांनी म्हटले आहे. मला ह्युमन इंटरेस्ट स्टोरी आवडतात, आणि संजय दत्तवर तयार होणारी फिल्म देखील ह्युमन इंटरेस्टचाच एक भाग असेल, असेही त्यांनी मुंबईतील जिओ मामी फिल्म फेस्टिव्हलमध्ये एका कार्यक्रमात सांगितले. महोत्सवातील एका कार्यक्रमात चित्रपट कसा बनवावा, या विषयावर ते बोलत होते. त्यांच्यासोबत दुसरे एक लेखक अभिजित जोशीही उपस्थित होते. कोणाच्याही आयुष्याचा जीवनपट चित्रपटात बांधणे ही सोपी गोष्ट नसते, मात्र तरीही आपण त्यावर काम करीत आहोत. खरं तर अख्खं आयुष्य तीन तासांच्या चित्रपटात मांडताना कौशल्य पणाला लागते, असे सांगून संजय दत्तलाही याचा पहिला ड्राफ्ट दाखविण्यात आला आहे. त्यासाठी अभिजित आणि मी स्वत: सलग २५ दिवस संजय दत्तला भेटत होतो. पण, त्याला त्यात व्यस्त ठेवून आम्ही स्क्रीप्ट दाखवले. त्यावेळी ते फायनल झाले, असेही

Web Title: Filmmaker on Sanjubaba making Hirani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.