​फिल्मफेअर अवार्ड 2017 : ‘दंगल’चीच बाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2017 13:32 IST2017-01-15T13:32:14+5:302017-01-15T13:32:14+5:30

filmfare awards 2017 complete list of winners : filmfare awards 2017 : नववर्षातील पहिला मानाचा पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. मोठ्या दिमाखात पार पडलेल्या या सोहळ्याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. हा सोहळा म्हणजे, यंदाचा फिल्मफेअर पुरस्कार.

Filmfare Award 2017: "Dangle" | ​फिल्मफेअर अवार्ड 2017 : ‘दंगल’चीच बाजी

​फिल्मफेअर अवार्ड 2017 : ‘दंगल’चीच बाजी

वर्षातील पहिला मानाचा पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. मोठ्या दिमाखात पार पडलेल्या या सोहळ्याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. हा सोहळा म्हणजे, यंदाचा फिल्मफेअर पुरस्कार. मुंबईत शनिवारी रात्री ६२ वा फिल्मफेअर पुरस्कार सोहळा पार पाडला. सलमान खान आणि करण जोहर यांच्या सूत्रसंचालनाने रंगलेल्या  या सोहळ्यात पुरस्कारांवर कुणी कुणी नाव कोरले, हे जाणून घेण्यास तुम्ही उत्सूक असाल. तर या सोहळ्यातील विजेत्यांची संपूर्ण यादी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. या सोहळ्यात  सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आणि सर्वोत्कृष्ट चित्रपट हे तिन्ही महत्त्वाचे पुरस्कार ‘दंगल’च्या झोळीत पडले. सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार बॉलिवूडची चुलबुली गर्ल आलिया भट्टने पटकावला. ‘उडता पंजाब’ या चित्रपटासाठी तिने हा पुरस्कार पटकावला.याच चित्रपटासाठी दिलजीत दोसांज यांने सर्वाेत्कृष्ट पदार्पणाचा पुरस्कार मिळवला.
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या एकापेक्षा एक धमाकेदार परफॉर्मन्सने या सोहळ्यात रंग भरले.

विजेत्यांची संपूर्ण यादी

सर्वोत्कृष्ट चित्रपट- दंगल
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- नितेश तिवारी (दंगल)

{{{{twitter_video_id####}}}}


सर्वोत्कृष्ट अभिनेता- आमिर खान (दंगल)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- आलिया भट्ट (उडता पंजाब) 



सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेता- दिलजीत दोसांज (उडता पंजाब)
सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्री- रितीका सिंग (साला खडूस)
सर्वोत्कृष्ट चित्रपट (प्रेक्षकांची निवड)- खामखा
सर्वोत्कृष्ट लघुपट (फिक्शन)- चटणी
सर्वोत्कृष्ट लघुपट (नॉन फिक्शन)- मातीतली कुस्ती
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (लघुटप)- तिस्का चोप्रा (चटणी)
सर्वोत्कृष्ट संवाद- रितेश शाह (पिंक)
सर्वोत्कृष्ट पटकथा- शकुण बत्रा, आएशा देवित्रे ढिल्लोन (कपूर अ‍ॅण्ड सन्स)
सर्वोत्कृष्ट सहकलाकार (अभिनेता)- ऋषी कपूर (कपूर अ‍ॅण्ड सन्स)
सर्वोत्कृष्ट सहकलाकार (अभिनेत्री)- शबाना आझमी (नीरजा)

{{{{twitter_video_id####}}}}


फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार- शत्रुघ्न सिन्हा
सर्वोत्कृष्ट संगीत- प्रितम (ऐ दिल है मुश्किल)
सर्वोत्कृष्ट गीतकार- अमिताभ भट्टाचार्य (ऐ दिल है मुश्किल ह्यचन्ना मेरेयाह्ण)
सर्वोत्कृष्ट गायक- अरिजीत सिंग (ऐ दिल है मुश्किल शीर्षक गीत)

{{{{twitter_video_id####}}}}


सर्वोत्कृष्ट गायिका- नेहा भसिन (सुलतान ह्यजग घुमियाह्ण)
सर्वोत्कृष्ट वीएफएक्स- फॅन
सर्वोत्कृष्ट एडिटिंग- मोनिष बालदवा (नीरजा)
सर्वोत्कृष्ट वेशभूषा- पायल सलुजा (उडता पंजाब)
सर्वोत्कृष्ट साहसदृश्य- श्याम कौशल (दंगल)
सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शन- आदिल शेख (कपूर अ‍ॅण्ड सन्स ह्यकर गयी चुलह्ण)
समीक्षक पुरस्कार
सर्वोत्कृष्ट चित्रपट- नीरजा
सर्वोत्कृष्ट अभिनेता- मनोज वाजपेयी (अलिगढ), शाहिद कपूर (उडता पंजाब)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- सोनम कपूर (नीरजा)
 
 

Web Title: Filmfare Award 2017: "Dangle"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.