​फ रहान अख्तर-जेम्स सँगर यांची जुगलबंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2016 21:16 IST2016-12-15T21:16:26+5:302016-12-15T21:16:26+5:30

बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तरने चित्रपट निर्माता, दिग्दर्शक व रॉक सिंगर म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. देशभरात त्याने आपल्या ...

Fiance Akhtar-Jamshedgir Jogalbandi | ​फ रहान अख्तर-जेम्स सँगर यांची जुगलबंदी

​फ रहान अख्तर-जेम्स सँगर यांची जुगलबंदी

ong>बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तरने चित्रपट निर्माता, दिग्दर्शक व रॉक सिंगर म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. देशभरात त्याने आपल्या बँडच्या माध्यमातून अनेक रॉक संगीताचे शो सादर केले असून आता फरहान एका आंतराष्ट्रीय प्रोजेक्टवर काम करीत आहे. ख्यातनाम संगीत निर्माते व कार्यक्रम सादरकर्ते जेम्स सँगर यांच्याशी फरहानचा करार झाला आहे. दोघेही इंडी-इंग्लिश गाण्यांचा अल्बमसाठी एकत्र आले आहेत. 

आगामी आंतरराष्ट्रीय प्रोजेक्टची माहिती देताना फरहान म्हणाला, मी फ्रान्स येथील ब्रिटीश संगीतकार जेम्स सँगर यांच्यासह एका अल्बमवर काम करीत आहे. जेम्स सध्या भारतात आहेत. माझ्या वैयक्तिक जीवनावर गीते असतील. मी दिलेल्या गाण्यापैकी चार गाण्यांची निवड करण्यात आली आहे. जेम्स हे संगीत क्षेत्रातील मोठे नाव असून मागील २५ वर्षांत त्यांनी अद्भूत काम केले आहे. संगीत निर्माते व सादरकर्ते म्हणून त्यांच्या कार्यक्रमांच्या ६० लाख रेकॉर्डची विक्री  झाली आहे. ३ ब्रिट, १८ ग्रमी व ३ आयव्हर नेव्हिलो अवॉर्डवर त्यांनी आपले नवा कोरले आहे. अनेक आंतरराष्ट्रीय संगीत कलावंतासोबत त्यांनी काम केले आहे, असेही फरहान म्हणाला. 

आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्याती मिळविणारे संगीतकार जेम्स सँगर यांनी यापूर्वी प्रसिद्ध बँड ‘यू२’ आंतराष्ट्रीय रॉक गायिका मडोना आणि गायक फिल कॉलिन्स यांच्यासोबत काम केले आहे. भारतीय कलाकारासोबत जेम्सचा हा पहिला अल्बम असल्याचे सांगण्यात येते. फरहान व जेम्स यांच्या यांनी अल्बमवर काम सुरू केले आहे. या अल्बममधील गीते व कविता फरहानच्या असतील. तर या गाण्यांना संगीतबद्ध करण्याची जबाबदारी जेम्स यांनी घेतली आहे. फरहानने लिहिलेल्या गीतांना चाल लावण्यात आली असून बेसिक म्युझिक तयार झाले असल्याचे सांगण्यात येते. मात्र, अद्याप या अल्बमचे नाव काय असेल याची माहिती देण्यात आली नाही. 


Web Title: Fiance Akhtar-Jamshedgir Jogalbandi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.