सिंगल असण्याची भीती आवडते -सल्लू
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2016 04:44 IST2016-02-16T11:44:26+5:302016-02-16T04:44:26+5:30
तरूणाईच्या हृदयाची धडकन म्हणजे सलमान खान. तो सध्या बॉलीवूडमधील सर्वांत पात्र बॅचलर आहे. तो कधी लग्न करणार हा सर्वांच्या ...

सिंगल असण्याची भीती आवडते -सल्लू
रूणाईच्या हृदयाची धडकन म्हणजे सलमान खान. तो सध्या बॉलीवूडमधील सर्वांत पात्र बॅचलर आहे. तो कधी लग्न करणार हा सर्वांच्या उत्सुकतेचा मुद्दा बनला आहे. पण अधूनमधून तो असे काही कमेंट्स करतो की, त्यामुळे सर्वच जण शॉक होतात. तो म्हणतो,‘ मला सिंगल असण्याची भीती तर वाटते पण ती भीती मी एन्जॉय करतो.’ ‘फिअर व्हर्सेस नीरजा’ या सोनम कपूरच्या सोशल मीडियावरील कॅम्पेनवर सलमान खानने कमेंट केली की,‘ मला मी बॅचलर असण्याची जास्त भीती वाटते. पण मला ही भीती आवडते. अजून काही काळ मला जर बॅचलर राहता आले तर आवडेलच. सलमान आगामी चित्रपट यशराज फिल्मस च्या ‘सुल्तान’ या आगामी चित्रपटात दिसणार आहे. यात तो सुल्तान अली खान या हरयाणा आधारित पहेलवानाची भूमिका साकारतोय.