Father's Day Special : बॉलिवूडचे सुपर डॅड; रिल लाइफबरोबरच रिअल लाइफमध्ये आपल्या मुलांचे आहेत सुपरहिरो!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2017 16:17 IST2017-06-18T08:50:22+5:302017-06-18T16:17:24+5:30

हे यांचे गुुरू आहेत, सुपरहिरो आणि बेस्ट फ्रेंडही आहेत. होय, आम्ही त्या सुपर डॅडविषयी सांगत आहोत, जे आपल्या मुलाला ...

Father's Day Special: Bollywood's Super Dad; In addition to Ril Life, real kids have their children in superhero !! | Father's Day Special : बॉलिवूडचे सुपर डॅड; रिल लाइफबरोबरच रिअल लाइफमध्ये आपल्या मुलांचे आहेत सुपरहिरो!!

Father's Day Special : बॉलिवूडचे सुपर डॅड; रिल लाइफबरोबरच रिअल लाइफमध्ये आपल्या मुलांचे आहेत सुपरहिरो!!

यांचे गुुरू आहेत, सुपरहिरो आणि बेस्ट फ्रेंडही आहेत. होय, आम्ही त्या सुपर डॅडविषयी सांगत आहोत, जे आपल्या मुलाला हिटलरसारखे रागावतात अन् त्यांना एखाद्या मित्राप्रमाणे जीवही लावतात. ‘फादर्स डे’निमित्त रिल लाइफपासून ते रिअल लाइफपर्यंत आपल्या मुलाचे सुपरहिरो असलेल्या या फादर्सनी वडील-मुलामधील नात्याची परिभाषाच लिहिली आहे. वास्तविक प्रत्येकाच्याच जीवनात आई-वडिलांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. आई आपल्या मुलाला प्रेमाने जगातील प्रत्येक सुख देण्याचा प्रयत्न करते तर वडील प्रेमाबरोबर काहीसे कठोर होऊन मुलाच्या आयुष्याला आकार देण्याचा प्रयत्न करतात. मात्र कठोर होताना त्यांच्यातील प्रेम वाढतच असते. एखाद्या वटवृक्षाप्रमाणे वडील आपल्या मुलाचा सांभाळ करतात. एकंदरीतच वडील सिंपल असो वा रॉकस्टार आपल्या मुलाच्या आनंदासाठी ते नेहमीच प्रयत्नांची पराकाष्टा करताना बघावयास मिळतात. अशाच काही बॉलिवूडमधील सुपरडॅडची माहिती सांगणारा हा वृत्तांत...



अमिताभ बच्चन
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी आपल्या करिअरमध्ये विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. त्यातील काही भूमिका हिट झाल्या तर काही फ्लॉपही झाल्या. परंतु वडिलांच्या भूमिकेत त्यांचा परफॉर्मन्स नेहमीच उत्कृष्ट राहिला आहे. वास्तविक जीवनात त्यांनी एक वडील म्हणून आपली भूमिका उत्कृष्टपणे पार पाडली आहे. आपल्या मुलांमध्ये उत्साह निर्माण करण्यात अन् त्यांच्या विषयात आनंदाचे रंग भरण्यात ‘पापा’ अमिताभ नेहमीच आघाडीवर राहिले आहेत. अमिताभ यांनी १९७३ मध्ये अभिनेत्री जया भादुरी यांच्याशी विवाह केला. त्यांना अभिषेक आणि श्वेता अशी दोन मुले आहेत. वडिलांची भूमिका साकारताना त्यांनी ‘बागबान’ आणि ‘कभी खुशी कभी गम’ या चित्रपटांमध्ये छाप पाडली आहे.



ऋषि कपूर
बॉलिवूडचे चिंटू म्हणजेच ऋषी कपूर आपल्या उत्साही स्वभावासाठी ओळखले जातात. मात्र रिअल लाइफमध्ये ते खूपच चांगले आणि केयरिंग फादर आहेत. १९८० मध्ये नीतू सिंग यांच्याशी त्यांनी विवाह केला होता. या दाम्पत्याला रणबीर आणि रिद्धिमा अशी दोन मुले आहेत. या दोन्ही मुलांना पप्पा ऋषीवर अभिमान आहे. रिअल लाइफमध्ये वडिलांची भूमिका चोखपणे पार पाडत असताना, रिल लाइफमध्येदेखील त्यांनी या भूमिकेला न्याय दिला आहे. ‘नमस्ते लंडन’ आणि ‘पटियाला हाऊस’मध्ये त्यांनी साकारलेली वडिलांची भूमिका अविस्मरणीय ठरली आहे.



आमिर खान

नुकत्याच रिलीज झालेल्या सुपरहिट ‘दंगल’ या चित्रपटात अभिनेता आमिर खान याने ‘हानिकारक बापू’ची भूमिका साकारली. परंतु वास्तविक जीवनात आमिर खूपच केयरिंग फादर असून, आपल्या मुलांप्रती तो नेहमीच काळजीवाहू राहिला आहे. आमिरने १९८६ मध्ये रीना दत्ता हिच्याशी विवाह केला होता. पुढे २००२ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यांनतर २००५ मध्ये त्याने किरण राव हिच्याशी दुसरे लग्न केले. त्याच्या तिसºया आझाद नावाच्या मुलाचा जन्म सरोगसी पद्धतीने झाला. आमिर रिअल लाइफमध्ये खूपच शांत स्वभावाचा असून, आपल्या मुलांप्रती तो नेहमीच प्रोटेक्टिव असतो.  



अनिल कपूर

फेव्हरेट आणि सुपर डॅडीच्या लिस्टमध्ये अनिल कपूर याचे नाव आघाडीवर आहे.  त्यामुळे फादर्स डेनिमित्त सर्वांत मॉडर्न आणि फिट दिसणाºया पप्पा अनिल कपूरविषयी सांगणे अगत्याचे ठरते. अनिल कपूरला तीन मुले आहेत. सर्वात मोठ्या मुलीचे नाव सोनम कपूर आणि दुसºया मुलीचे रिआ आणि सर्वात लहान मुलाचे नाव हर्षवर्धन आहे. अनिल कपूर याच्या वयाचा अंदाज येत नसला तरी, आज त्याचे तिन्ही मुले स्वत:च्या पायावर उभे आहेत. अर्थातच यामागे अनिल कपूर यांनी आपल्या मुलांचा केलेला उत्कृष्ट सांभाळ आणि संस्कार आहेत. सुपरडॅडी अनिल कपूरने ‘दिल धडकने दो’ या चित्रपटात वडिलांची भूमिका साकारली आहे.



धर्मेंद्र 
पंजाबमध्ये जन्मलेले धर्मेंद्र सिंग देओल यांना सहा मुले आहेत. सुपरडॅडी धर्मेंद्र त्यांच्या दमदार अंदाजासाठी ओळखले जातात. त्यांचा पहिला विवाह १९५४ साली प्रकाश कौर यांच्याशी झाला होता. यावेळी त्यांना चार मुले झाले होते. सनी देओल आणि बॉबी देओल हे त्यातीलच दोघे आहेत. पुढे १९७९ मध्ये त्यांनी ड्रिम गर्ल हेमामालिनी यांच्याशी दुसरा विवाह केला. हेमामालिनी आणि धर्मेंद्र यांना दोन मुली झाल्या. ईशा देओल आणि अहाना देओल. रिअल लाइफमध्ये धर्मेंद्र आपल्या सहाही मुलांचा अतिशय काळजीपूर्वक आजही सांभाळ करतात. सर्वच मुले धर्मेंद्र यांच्या क्लोज आहेत. रिल लाइफमध्येदेखील त्यांनी ‘यमला पगला दिवाना’ या चित्रपटात आपल्या मुलांसोबत सुपरडॅडीची भूमिका साकारली. 

Web Title: Father's Day Special: Bollywood's Super Dad; In addition to Ril Life, real kids have their children in superhero !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.