'ही नाईट ड्रेसवर का फिरतेय', फॅशन ट्रेन्डमुळे सोनम कपूर पुन्हा ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2024 06:51 PM2024-04-03T18:51:18+5:302024-04-03T18:51:33+5:30

नुकतेच सोनम कपूर बांद्रा येथे एका बुक लॉन्च इव्हेंटमध्ये सहभागी झाली.

fashionista of Bollywood Sonam Kapoor Trolled In Black Dress By Netizens on Social Media | 'ही नाईट ड्रेसवर का फिरतेय', फॅशन ट्रेन्डमुळे सोनम कपूर पुन्हा ट्रोल

'ही नाईट ड्रेसवर का फिरतेय', फॅशन ट्रेन्डमुळे सोनम कपूर पुन्हा ट्रोल

बॉलिवूडमध्ये फॅशनिस्टा म्हणून सोनम कपूर ओळखली जाते. तिच्या फॅशनची बरीच चर्चा असते. अनेक जण तिला फॅशन आयकॉनही म्हणतात. तिने डिझाईन केलेले कपडे अनेकदा खूप वेगळे आणि विचित्र असतात. तिच्या आगळ्या वेगळ्या फॅशनमुळे ती नेहमी चर्चेत असते. काहीवेळा तिच्या कपड्यांमुळे ती ट्रोलही झालेली आहे. नुकतेच सोनम कपूर बांद्रा येथे एका बुक लॉन्च इव्हेंटमध्ये सहभागी झाली. याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये तिचा लूक पाहून नेटकऱ्यांनी तिला प्रचंड ट्रोल केलं आहे. 

आता सोनम कपूरचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.  ‌या व्हिडिओमध्ये सोनम चालत येताना दिसत आहे. सोनमने काळ्या रंगाचा ड्रेस घातलेला आहे.  ती यात सूंदर दिसतेय. मात्र नेटकऱ्यांना तिचा हा ड्रेस आवडलेला नाही. सोनमच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्स करीत तिला ट्रोल केलं आहे. एकानं कमेंट करीत लिहिलं, 'ही नाईट ड्रेसवर का फिरतेय'. तर दुसऱ्या नेटकऱ्यानं कमेंट करीत लिहिलं, 'हिचा ड्रेसिंग सेन्स कुठे गेला'. ऐवढंचं नाही तर सोनमला एका युजरने थेट हॅगर म्हटलं आहे. तर एकाने लिहलं, 'यापेक्षा वाईट ड्रेस मी पाहिला नाही'.

सोनम कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, जिओ सिनेमावर तिचा ब्लाइंड हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. गेल्या काही दिवसांपासून सोनम कपूर बॉलिवूडपासून दूर आहे. पण तिचे फोटो कायम सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सोनम निःसंशयपणे खूप कमी चित्रपटांमध्ये दिसली आहे, परंतु तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटद्वारे, अभिनेत्री तिच्या चाहत्यांशी कनेक्ट होण्याची एकही संधी सोडत नाही.
 

Web Title: fashionista of Bollywood Sonam Kapoor Trolled In Black Dress By Netizens on Social Media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.