​नऊ वर्षांनंतर रिलीज होणार फरहान अख्तरचा चित्रपट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2017 15:36 IST2017-02-12T10:06:56+5:302017-02-12T15:36:56+5:30

बॉलिवूडमध्ये फरहान अख्तरने निर्माता, दिग्दर्शक व अभिनेता म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. अभिनेता म्हणून फरहान अख्तरचा ‘रॉक ...

Farhan Akhtar's film will be released after nine years | ​नऊ वर्षांनंतर रिलीज होणार फरहान अख्तरचा चित्रपट

​नऊ वर्षांनंतर रिलीज होणार फरहान अख्तरचा चित्रपट

लिवूडमध्ये फरहान अख्तरने निर्माता, दिग्दर्शक व अभिनेता म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. अभिनेता म्हणून फरहान अख्तरचा ‘रॉक आॅन’ हा पहिला चित्रपट मानला जातो. मात्र रॉक आॅन हा फरहानचा पहिला चित्रपट नव्हताच. त्याआधी त्याने ‘द फकिर आॅफ वेनिस’ हा चित्रपट साईन केला होता.  मात्र काही कारणास्तव तो प्रदर्शित होऊ शकला नाही. आता या चित्रपटाचा प्रदर्शनाचा मुहूर्त जाहीर झाला आहे. 

फरहान अख्तरने रॉक आॅन, लक बाय चान्स, शादी के साईड इफेक्टस्, कार्तिक कॉलिंग कार्तिक, भाग मिल्खा भाग, जिंदगी ना मिलेगी दोबारा, वजीर असे एकाहून एक सरस चित्रपट केले आहेत. या सर्व चित्रपटातून त्याच्या अभिनयाची प्रशंसा झाली आहे. रॉक आॅन हा जरी फरहानचा पहिला चित्रपट मानला जात असला तरी त्याने या चित्रपटापूर्वी ‘द फकिर आॅफ वेनिस’ हा चित्रपट साईन केला होता, मात्र रॉक आॅन आधी प्रदर्शित झाल्याने तो पहिला चित्रपट मानला जातो. आता रॉक आॅन चा दुसरा भाग तब्बल आठ वर्षांनी प्रदर्शित झाला तरी देखील त्याचा अधिकारिक पहिला चित्रपट प्रदर्शनाची वाट पाहत होता. आता मात्र ‘द फकिर आॅफ वेनिस’वरील सर्व संकटे टळली असून हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. येत्या १० मार्च रोजी ‘द फकिर आॅफ वेनिस’ प्रदर्शित केला जाणार आहे. 



‘द फकिर आॅफ वेनिस’ हा चित्रपट दिग्दर्शक होमी अदजानिया यांच्यावर आधारित असल्याचे सांगण्यात येते. यात फरहान अख्यर साकारत असलेली भूमिका होमीची असेल असे सांगण्यात येते. या चित्रपटात फरहान अख्तरसोबत कमल सिद्धू, इटालीयन अभिनेत्री वेलेंटिना आणि जर्मन अभिनेता मॅथ्यू कॅरेरे यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन आनंद सुरापूर व निर्मिती पुनित देसाई यांनी केली आहे. 

Web Title: Farhan Akhtar's film will be released after nine years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.