फरहान अख्तरची एक्स वाईफ अधुना भाबनी पडली कुणाच्या प्रेमात?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2017 15:27 IST2017-04-06T09:57:43+5:302017-04-06T15:27:43+5:30
फरहान अख्तरची एक्स वाईफ आणि सुप्रसिद्ध हेअर स्टाईलिस्ट अधुना भाबनी प्रेमात पडलीय. होय! फरहान अख्तरपासून वेगळे झाल्यानंतर तिच्या आयुष्यातही ...

फरहान अख्तरची एक्स वाईफ अधुना भाबनी पडली कुणाच्या प्रेमात?
फ हान अख्तरची एक्स वाईफ आणि सुप्रसिद्ध हेअर स्टाईलिस्ट अधुना भाबनी प्रेमात पडलीय. होय! फरहान अख्तरपासून वेगळे झाल्यानंतर तिच्या आयुष्यातही एका नव्या व्यक्तिने एन्ट्री घेतलीय. खरे तर फरहान व अधुनाचा घटस्फोट अद्याप झालेला नाही. पण दोघांच्या वाटा वेगळ्या होऊन बराच काळ लोटलाय. या काळात एकीकडे फरहान व श्रद्धा कपूर यांच्या नात्याची चर्चा सुरु झाली आहे. तर दुसरीकडे अधुनालाही नवे प्रेम गवसले आहे.
![]()
काही दिवसांपूर्वी अधुनाने आपला ५० वा वाढदिवस साजरा केला होता. शिवाय आपल्या सोशल अकाऊंटवर एक कविताही शेअर केली होती. तिची ही कविता बरेच काही सांगणारी होती. कुण्या एका व्यक्तिच्या येण्याने आयुष्यात उमेद यावी,अशी भावना अधुनाने या कवितेच्या माध्यमातून व्यक्त केली होती. खरे तर बॉलिवूडमध्ये सध्या सुरु असलेल्या चर्चेवरूनही हेच दिसतेय. अधुनाच्या आयुष्यात कुणीतरी आहे आणि ही व्यक्ति दुसरीकुणी नसून मॉडल व अभिनेता डिनो मोरियोचा भाऊ निकोलो मोरियो आहे. निकोलो हा डिनोचा लहान भाऊ आहे.
मुंबईत तो एक हिप बार चालवतो. अधुना अलीकडे अनेकदा निकोलोसोबत दिसायला लागली आहे. केवळ इतकेच नाही तर दोघांनी कपलप्रमाणे एकत्र जाणेही सुरु केले आहे. दोन आठवड्यांपूर्वी खारमधील एका रेस्टॉरंटमध्ये हे दोघे दिसले होते.
ALSO READ : श्रद्धा-फरहानचे सिक्रेट अफेअर?
फरहान आणि अधुनाने घटस्फोटाचा अर्ज दाखल केलाय. या महिन्यात त्यांना विभक्त होऊन सहा महिने पूर्ण होतील.त्यानंतर त्यांना कायदेशीर घटस्फोट मिळेल. अर्थात या घटस्फोटाचे कारण अद्यापही जगासमोर आलेले नाही. केवळ आमच्यातील नाते संपले आहे. आम्ही एकमेकांसाठी योग्य नाही आहोत,असे सांगत त्यांनी घटस्फोटाची मागणी केली आहे.