फरहान अख्तर ‘या’ आगामी चित्रपटासाठी करतोय प्रचंड मेहनत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 05:30 PM2019-05-26T17:30:00+5:302019-05-26T17:30:02+5:30

‘भाग मिल्खा भाग’च्या तुफान यशानंतर अभिनेता फरहान अख्तर आणि दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा पुन्हा एकदा एकत्र येणार आहेत. बॉक्सिंगवर ...

Farhan Akhtar is working hard for the forthcoming film 'Awesome'! | फरहान अख्तर ‘या’ आगामी चित्रपटासाठी करतोय प्रचंड मेहनत!

फरहान अख्तर ‘या’ आगामी चित्रपटासाठी करतोय प्रचंड मेहनत!

googlenewsNext

‘भाग मिल्खा भाग’च्या तुफान यशानंतर अभिनेता फरहान अख्तर आणि दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा पुन्हा एकदा एकत्र येणार आहेत. बॉक्सिंगवर आधारित एका चित्रपटावर ते काम करत आहेत. ‘तुफान’ असं या चित्रपटाचं नाव असून याची घोषणा फरहानने ट्विटरवर केली होती. या चित्रपटात फरहानसोबत अजून कोणते कलाकार दिसणार आहेत हे मात्र निर्मात्यांनी गुलदस्त्यात ठेवले आहे. 

फरहान या चित्रपटातील त्याच्या भूमिकेसाठी जोरदार तयारी करत आहे. या तयारीचे काही फोटो फरहानने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. आपल्या निरोगी राहण्यातून, दिसण्यातून आणि न चुकता व्यायाम करण्याच्या सवयीतून फरहान त्याच्या चाहत्यांना कायमच प्रेरणा देत असतो. फरहानने नुकताच इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला असून त्यामध्ये तो बॉक्सिंग प्रॅक्टिस करताना दिसत आहे. 

या चित्रपटात एका बॉक्सरची भूमिका फरहान निभावत असल्याने, भूमिका योग्य वठवण्यासाठी तो खूप मेहनत घेत आहे. राकेश ओमप्रकाश मेहरा म्हणाले की,‘या चित्रपटासाठी मी खूप उत्सुक आहे. याविषयी मी फार बोलू शकत नाही कारण आम्ही अजून चित्रीकरण सुरु केलेलं नाहीये. मी आणि फरहान जवळपास सहा वर्षांनी एकत्र काम करणार आहोत. लेखक अंजुमन राजबली यांनी ही बॉक्सरची प्रेमकथा लिहिली आहे.’

Web Title: Farhan Akhtar is working hard for the forthcoming film 'Awesome'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.