फरहान अख्तर दिसणार बॉक्सरच्या भूमिकेत, 'या' दिग्दर्शकासोबत करणार सहा वर्षांनी काम
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2019 21:00 IST2019-01-16T21:00:00+5:302019-01-16T21:00:00+5:30
'भाग मिल्खा भाग'नंतर पुन्हा एकदा फरहान अख्तर आणखीन एका खेळावर आधारित सिनेमात काम करण्यास सज्ज झाला आहे. या सिनेमात फरहान बॉक्सरच्या भूमिकेत दिसणार आहे.

फरहान अख्तर दिसणार बॉक्सरच्या भूमिकेत, 'या' दिग्दर्शकासोबत करणार सहा वर्षांनी काम
'भाग मिल्खा भाग'नंतर पुन्हा एकदा फरहान अख्तर आणखीन एका खेळावर आधारित सिनेमात काम करण्यास सज्ज झाला आहे. या सिनेमात फरहान बॉक्सरच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमात 'तूफान' नावाची भूमिका फरहान अख्तर साकारतोय. या सिनेमाच्या निमित्ताने सहा वर्षानंतर राकेश ओम प्रकाश मेहरा आणि फरहान अख्तर एकत्र येणार आहेत. याची निमिर्ती फरहान आणि रितेश सिंधवानी एकत्र मिळून करणार आहेत.
हा सिनेमा कोणाचाही बायोपिक नसून अंजुम राजाबली यांच्या काल्पनिक कथेवर आधारित आहे. यासिनेमासाठी फरहान बॉक्सिंगचे प्रशिक्षण घेणार आहे. फरहान राकेश ओम प्रकाश मेहरांसोबत पुन्हा एकदा काम करण्यास उत्सुक आहे. यावर्षीपासूनच सिनेमाची शूटिंग सुरु होण्याची शक्यता आहे.
IT'S OFFICIAL... After #BhaagMilkhaBhaag, Rakeysh Omprakash Mehra and Farhan Akhtar reunite for #Toofan... A heartfelt story of a boxer... Mehra will direct the film.
— taran adarsh (@taran_adarsh) 16 January 2019
गेल्या काही दिवसांपासून फरहान शिबानी दांडेकरसोबत असलेल्या अफेअरमुळे चर्चेत आहे. शिबानी दोघांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. काही दिवसांपूर्वी तिने दोघांचा स्विमिंगपूलमधला फोटो शेअर केला होता. फरहान आणि शिबानी एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाल्याचे पाहायला मिळत आहे. काही दिवसांआधी दोघेही व्हॅकेशन एन्जॉय करत असल्याचे फोटोसुद्धा व्हायरल झाले होते. या दोघांचा साखरपुडा झाला असून एप्रिलमध्ये ते लग्नबेडीत अडकणार असल्याच्या चर्चा आहे.