​फरहान अख्तरने घेतला फेसबुकचा निरोप! अकाऊंट केले डिलिट !!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2018 11:51 IST2018-03-27T06:17:12+5:302018-03-27T11:51:08+5:30

डेटा लीक प्रकरणामुळे फेसबुक ही सोशल नेटवर्किंग साईट गेल्या काही दिवसांपासून वादात सापडली आहे. या वादादरम्यान बॉलिवूड अभिनेता फरहान ...

Farhan Akhtar took the message of Facebook! Deleted Account Deleted !! | ​फरहान अख्तरने घेतला फेसबुकचा निरोप! अकाऊंट केले डिलिट !!

​फरहान अख्तरने घेतला फेसबुकचा निरोप! अकाऊंट केले डिलिट !!

टा लीक प्रकरणामुळे फेसबुक ही सोशल नेटवर्किंग साईट गेल्या काही दिवसांपासून वादात सापडली आहे. या वादादरम्यान बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर याने फेसबुकला रामराम ठोकला आहे. होय, फरहानने त्याचे फेसबुक अकाऊंट कायमचे डिलिट केले आहे. आज twitterवरून फरहानने याची घोषणा केली.
‘सुप्रभात, मी आपल्याला सूचित करू इच्छितो की, मी माझे फेसबुक अकाऊंट नेहमीसाठी डिलीट केले आहे. अर्थात सत्यांकित ‘फरहान अख्तर लाईव्ह पेज’ अद्यापही सक्रीय आहे,’ असे tweet फरहानने केले. आता फरहानने फेसबुक अकाऊंट का डिलिट केले, हे कळायला मार्ग नाही. कारण फरहानने स्वत: याचे काहीही कारण दिलेले नाही. पण एक मात्र निश्चित फरहानच्या या ‘एफबीवरील एक्सिट’मुळे चाहत्यांची प्रचंड निराशा झाली आहे.


ALSO READ : एक्स वाईफ अधुनाला बॉयफ्रेन्डच्या मिठीत पाहून फरहान अख्तरने दिली अशी प्रतिक्रिया!

फरहानआधी स्पेश एक्स((SpaceX)चे सीईओ इओन मास्क, अमेरिकन सिंगर शेर आणि बॉलिवूड अभिनेता जिम कैरी यांनी आपले फेसबुक अकाऊंट डिलिट केले आहे. ब्रिटीश कंपनी केंब्रिज अ‍ॅनालिटिकाने फेसबुकशी जोडल्या गेलेल्या पाच कोटी सदस्यांच्या माहितीचा चुकीचा वापर केला, असा आरोप होत आहे. यानंतर फेसबुकवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. या डाटा लीक प्रकरणानंतर फेसबुकचे शेअर १४ टक्क्यांनी घसरले आहेत. या संपूर्ण पार्श्वभूमीवर एफबी अकाऊंट डिलिट करण्याच्या फरहान व अन्य सेलिब्रिटींच्या निर्णयाला डेटा लीक प्रकरणाशी जोडून पाहिले जात आहे.
फरहान अख्तरबद्दल सांगायचे झाल्यास, लवकरच तो ‘डॉन3’ घेऊन येणार आहे. फरहानने ‘डॉन’ आणि ‘डॉन2’ दिग्दर्शित केला होता. आता या हिट फ्रेन्चाइजीचा तिसरा पार्ट फरहान घेऊन येतोय. ताज्या बातमीनुसार, या तिसºया पार्टसाठी स्टारकास्टही फायनल झाली आहे. तिसºया भागातही  शाहरूख खान डॉन साकारणार असून फरहान स्वत: यात एका पोलिसाची भूमिका साकारताना दिणार आहे. अलीकडे फरहान ‘लखनऊ सेंट्रल’मध्ये दिसला होता. पण त्याचा हा चित्रपट बॉक्सआॅफिसवर दणकून आपटला होता.

Web Title: Farhan Akhtar took the message of Facebook! Deleted Account Deleted !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.