Farhan-Shibani Haldi Ceremony: फरहान अख्तर-शिबानी दांडेकरला लागली हळद, पाहा इनसाईड व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2022 10:11 AM2022-02-18T10:11:36+5:302022-02-18T10:14:05+5:30

Farhan Akhtar Shibani Dandekar Wedding Haldi Ceremony: तीन वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर अखेर लग्नबंधनात अडकणार आहेत.

farhan akhtar shibani dandekar mehendi haldi anusha dandekar rhea chakraborty spotted | Farhan-Shibani Haldi Ceremony: फरहान अख्तर-शिबानी दांडेकरला लागली हळद, पाहा इनसाईड व्हिडीओ

Farhan-Shibani Haldi Ceremony: फरहान अख्तर-शिबानी दांडेकरला लागली हळद, पाहा इनसाईड व्हिडीओ

googlenewsNext

 Farhan Akhtar Shibani Dandekar Haldi Ceremony: तीन वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर फरहान अख्तर ( Farhan Akhtar ) आणि शिबानी दांडेकर ( Shibani Dandekar) अखेर लग्नबंधनात अडकणार आहेत. उद्या 19 तारखेला  हिंदू पद्धतीने दोघंही विवाहबंधनात अडकणार असल्याची माहिती आहे. काल गुरूवारी या कपलची मेहंदी व हलदी सेरेमनी झाली. याचे काही इनसाईड व्हिडीओ व फोटो समोर आले आहेत. अद्याप नवरा-नवरीचे फोटो समोर आले नाहीत. पण फरहानची आई शबाना आझमी, शिबानीची बहीण अनुषा दांडेकर, रिया चक्रवर्ती, अमृता अरोरा असे सगळे या मेहंदी सेलिब्रेशनमध्ये सहभागी झालेत. त्यांचे फोटो व व्हिडीओ पापाराझींच्या कॅमेऱ्यात कैद झालेत.
या इव्हेंटमध्ये शबाना आझमी यांनी मस्टर्ड कलरचा आऊटफिट घातला होता. तर अनुषा यॅलो फ्रिलच्या साडीत होती.

घरात जातानाची फरहानची ओझरती झलक एका व्हिडीओत पाहायला मिळाली. रिया व अनुषा डान्स करत असतानाचा व्हिडीओही समोर आला आहे. घराच्या टेरेसवर रंगलेल्या या सोहळ्यात सगळे धम्माल मज्जा करताना दिसत आहेत.

सेलिब्रिटी फोटोग्राफर विरेंदर चावलानं त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही व्हिडीओ शेअर केले आहेत.  
उद्या फेब्रुवारीला  खंडाळा येथील फार्महाऊसवर फरहान व शिबानी महाराष्ट्रीयन पद्धतीनं  लग्नगाठ बांधणार असल्याचं बोललं जात आहे. 21 तारखेला फरहान व शिबानी मित्रमंडळींसाठी रिसेप्शन पार्टी देणार असल्याचेही कळतंय.

जावेद अख्तर यांनी काही दिवसांपूर्वीच फरहान-शिबानीच्या लग्नाची बातमी मीडियाला दिली होती. त्याचबरोबर हे लग्न त्यांच्या खंडाळा येथील फार्महाऊसवर खूप खाजगी आणि मोजक्या खास लोकांच्या उपस्थितीत होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं.

शिबानी दांडेकर हे मॉडलिंग क्षेत्रातील मोठे नाव आहे.  टाइमपास  या मराठी चित्रपटात ‘साजूक तुपातली पोळी’ या गाण्यात दिसलेली शिबानी दांडेकर अभिनेत्री असण्यासोबतच गायिका आणि मॉडेल आहे.फरहान व शिबानी लव्हस्टोरी कशी सुरू झाली हे जाणून घेण्यास तुम्हीही उत्सुक असाल तर ही लव्हस्टोरी सुरू झाली होती ती 2018 साली.होय, 2018 मध्ये शिबानीच्या आयुष्यात फरहानची एन्ट्री झाली. ‘आय कॅन डू दॅट’ या टीव्ही शोच्या सेटवर दोघांची पहिली भेट झाली होती.

शिबानीसाठी फरहानने पहिली पत्नी अधुनाला घटस्फोट दिला, असं म्हटलं जातं. पण चर्चा खरी मानाल तर अधुनाला घटस्फोट दिल्यानंतर वर्षभरानं दोघांची लव्हस्टोरी सुरू झाली होती.
‘आय कॅन डू दॅट’ या शोनंतर अचानक फरहान व शिबानीच्या नात्याची चर्चा सुरु झाली आणि काही दिवसांनंतर ‘प्यार किया तो डरना क्या’ असं म्हणत दोघांनीही आपलं नातं जगजाहिर केलं होतं.

 शिबानीनं सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला होता. ज्यात तिनं कोणाचा तरी हात पकडलेला होता आणि तिची पाठ दिसत होती. फोटो पाहिल्यानंतर लगेचच चाहत्यांना समजलं की तो फरहान अख्तर आहे.नंतर, फरहान अख्तरनं सोशल मीडियावर तोच फोटो शेअर करून त्यांच्या नात्याची अधिकृत माहिती दिली होती.

 यानंतर दीपिका आणि रणवीरच्या रिसेप्शनमध्ये हे जोडपं पहिल्यांदा अधिकृतपणे लोकांसमोर आलं होतं. दोघांनी एकमेकांचा हात पकडून या रिसेप्शनमध्ये एन्ट्री घेतली होती. फरहान व शिबानी यांनी कधीच आपलं नात लपवण्याचा प्रयत्न केला नाही. दोघंही सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे रोमॅन्टिक फोटो शेअर करत असतात.

Web Title: farhan akhtar shibani dandekar mehendi haldi anusha dandekar rhea chakraborty spotted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.