फरहान - शिबानी दांडेकरचा स्विमिंग पूलमध्ये रोमान्स, एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले हे कपल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2019 16:52 IST2019-01-14T16:46:31+5:302019-01-14T16:52:29+5:30
गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणारं एक कपलच्या लग्नाची चांगलीच चर्चा रंगली होती. हे कपल म्हणजे अभिनेता फरहान अख्तर आणि शिबानी ...

फरहान - शिबानी दांडेकरचा स्विमिंग पूलमध्ये रोमान्स, एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले हे कपल
गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणारं एक कपलच्या लग्नाची चांगलीच चर्चा रंगली होती. हे कपल म्हणजे अभिनेता फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर. नुकतेच या दोघांचा साखरपुडा झाला असून एप्रिलमध्ये ते लग्नबेडीत अडकणार असल्याच्या चर्चा आहेत. सध्या हे दोघे वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतात. आता हे दोघेही आणखीन एका दुस-याच कारणामुळे चर्चेत आले आहेत. याला निमित्त ठरले आहे ते म्हणजे या दोघांचा स्विमिंगपुलमधला रोमान्स. खुद्द शिबानीनेच सोशल मीडियावर स्विमिंगपुलमध्ये रोमाँटीक फोटो शेअर केले आहेत. यांत फारहान आणि शिबानी रोमँटिक पोजमध्ये एकमेकांच्या जवळ आल्याचे पाहायला मिळत आहे. शेअर केलेल्या फोटोला समर्पक अशी कॅप्शनही शिबानीने दिली आहे. फरहान आणि शिबानी एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाल्याचे पाहायला मिळत आहे. काही दिवसांआधी दोघेही व्हॅकेशन एन्जॉय करत असल्याचे फोटोसुद्धा व्हायरल झाले होते.
फरहान घटस्फोटीत आहे. २०१७ साली त्यानं पत्नी अधुनाशी घटस्फोट घेतला. या जोडप्याला दोन मुलं आहेत. गेल्या सप्टेंबरपासून फरहान आणि शिबानीच्या रोमांन्सची चर्चा सुरु झाली होती.
खुद्द शिबानीने फरहानसोबतचा लंडनच्या रस्त्यावरचा फोटो शेअर करत या चर्चेला तोंड फोडले होते. या फोटोत फरहान पाठमोरा होता. म्हणजे त्याचा चेहरा दिसत नव्हता. पण हा फरहान आहे, हे ओळखायला लोकांना वेळ लागला नव्हता. यानंतर तर होय, तो मीच, असे खुद्द फरहाननेच जाहिर केले होते.
आता फरहानच्या मुलांनीही (पहिली पत्नी अधुनापासून झालेली मुलं)हे नाते मनापासून स्वीकारले आहे. होय, शिबानी नुकतीच फरहानची मुलांसोबत वेळ घालवताना दिसली होती.