फरहान अख्तर व शिबानी दांडेकरची झाली एगेंजमेंट, यावर्षी मार्च किंवा एप्रिलमध्ये अडकणार लग्नबेडीत?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2019 19:19 IST2019-01-08T19:18:44+5:302019-01-08T19:19:11+5:30
अभिनेता फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर यांच्या अफेयरच्या चर्चा बऱ्याच कालावधीपासून सुरू आहे. तर यावर्षी फरहान व शिबानी विवाहबंधनात अडकणार असल्याची जोरदार चर्चा सध्या आहे.

फरहान अख्तर व शिबानी दांडेकरची झाली एगेंजमेंट, यावर्षी मार्च किंवा एप्रिलमध्ये अडकणार लग्नबेडीत?
अभिनेता फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर यांच्या अफेयरच्या चर्चा बऱ्याच कालावधीपासून सुरू आहे. तर यावर्षी फरहान व शिबानी विवाहबंधनात अडकणार असल्याची जोरदार चर्चा सध्या बॉलिवूडमध्ये आहे. म्हणे, त्या दोघांनी एकमेकांना अंगठ्या घातल्या असून यावर्षी मार्च किंवा एप्रिलमध्ये ते लग्नबेडीत अडकू शकतात अशी माहिती सूत्रांकडून मिळते आहे. मात्र अद्याप या गोष्टीला त्यांच्याकडून दुजोरा मिळालेला नाही.
फरहान व शिबानी एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले आहेत. आता फरहानच्या मुलांनीही (पहिली पत्नी अधुनापासून झालेली मुलं)हे नाते मनापासून स्वीकारले आहे. होय, शिबानी नुकतीच फरहानची मुलांसोबत वेळ घालवताना दिसली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फरहान आणि शिबानी आपल्या नात्याबद्दल गंभीर आहेत. फरहानच्या मुलांनादेखील शिबानी आवडते. त्यामुळे ते दोघेही नक्कीच पुढचा विचार करतील.
टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार नुकतेच त्या दोघांची एगेंजमेंट पार पडली असून ते दोघे मार्च किंवा एप्रिलमध्ये विवाह करतील.
फरहान घटस्फोटीत आहे. २०१७ साली त्यानं पत्नी अधुनाशी घटस्फोट घेतला. या जोडप्याला दोन मुलं आहेत. गत सप्टेंबरपासून फरहान व शिबानीच्या रोमांन्सची चर्चा सुरु झाली होती. खुद्द शिबानीने फरहानसोबतचा लंडनच्या रस्त्यावरचा फोटो शेअर करत या चचेर्ला तोंड फोडले होते. या फोटोत फरहान पाठमोरा होता. म्हणजे त्याचा चेहरा दिसत नव्हता. पण हा फरहान आहे, हे ओळखायला लोकांना वेळ लागला नव्हता. यानंतर तर होय, तो मीच, असे खुद्द फरहाननेच जाहिर केले होते.
आता हे दोघे लग्न कधी करतायेत याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
फरहान ‘द स्काज इज पिंक’ या चित्रपटात दिसणार असून सध्या तो या सिनेमाच्या शूटींगमध्ये बिझी आहे.
सोनाली बोस दिग्दर्शित या चित्रपटात प्रियांका चोप्रा आणि झायरा वसीम मुख्य भूमिकेत आहेत.