फरहान अख्तरचा तुफान या तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 19:54 IST2021-06-16T19:51:12+5:302021-06-16T19:54:11+5:30
भाग मिल्खा भाग या सिनेमातील यशस्वी भागीदारीनंतर फरहान अख्तर आणि राकेश ओमप्रकाश मेहरा ही दमदार जोडी तुफान मधून एक दमदार पंच पुन्हा एकदा घेऊन आली आहे.

फरहान अख्तरचा तुफान या तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीस
राकेश ओमप्रकाश मेहरा दिग्दर्शित आणि एक्सेल एंटरटेनमेंट (रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर) आणि आरओएमपी पिक्चर्स (राकेश ओमप्रकाश मेहरा) यांची निर्मिती असलेला तुफान हा स्पोर्ट्स ड्रामा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. भारत आणि जगभरातील 240 हून अधिक देश आणि प्रांतांमधील चाहत्यांना हा अत्यंत रंजक सिनेमा 16 जुलै पासून अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर पाहता येईल. तुफान मध्ये फरहान अख्तर प्रमुख भूमिकेत आहे. त्याचप्रमाणे मृणाल ठाकुर, परेश रावल, सुप्रिया पाठक कपूर, हुसैन दलाल, डॉ. मोहन आगाशे, दर्शन कुमार आणि विजय राज यांच्याही या सिनेमात मुख्य भूमिका आहेत.
भाग मिल्खा भाग या सिनेमातील यशस्वी भागीदारीनंतर फरहान अख्तर आणि राकेश ओमप्रकाश मेहरा ही दमदार जोडी तुफान मधून एक दमदार पंच पुन्हा एकदा घेऊन आली आहे. ही प्रेरणादायी कथा आहे मुंबईतील डोंगरी भागात मोठा होऊन स्थानिक गुंड झालेल्या अज्जू या अनाथ मुलाची.
अनन्या या हुशार, प्रेमळ मुलीला भेटल्यानंतर त्याचं आयुष्य बदलून जातं. तिचा त्याच्यावर विश्वास आहे आणि त्यामुळेच त्याला स्वत:ची वेगळी ओळख शोधण्याची जिद्द लाभते. या जिद्दीतूनच अजीज अली हा बॉक्सिंग चॅम्पियन तयार होण्याचा प्रवास यात चितारला आहे.