फरहानच्या अडेलतट्टूपणाने श्रद्धा नाराज!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2016 16:28 IST2016-10-16T16:28:14+5:302016-10-16T16:28:14+5:30
फरहान अख्तर आणि श्रद्धा कपूर यांच्या ‘सीक्रेट अफेअर’च्या वावड्या उठत असतानाच आता श्रद्धा फरहानच्या अडेलतट्टूपणामुळे दुखावल्याची खबर आहे. होय, ...

फरहानच्या अडेलतट्टूपणाने श्रद्धा नाराज!
फ हान अख्तर आणि श्रद्धा कपूर यांच्या ‘सीक्रेट अफेअर’च्या वावड्या उठत असतानाच आता श्रद्धा फरहानच्या अडेलतट्टूपणामुळे दुखावल्याची खबर आहे. होय, ‘रॉक आॅन’च्या सीक्वलमध्ये फरहान, श्रद्धा मुख्य भूमिकेत आहे. चित्रपट जवळपास पूर्ण झाला आहे. पण त्यावेळी चित्रपटाच्या काही भागांवर नव्याने काम करण्यात येत असल्याचेही कानावर येत आहे. त्यातच चित्रपटाची लीड हिरोईन म्हणजेच श्रद्धा नाराज असल्याचीही बातमी आहे. श्रद्धाने या चित्रपटाची काही गाणी गायली आहेत, हे तर तुम्हाला ठाऊक आहेच. हेच श्रद्धाच्या नाराजीचे कारण आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रद्धा या गाण्याच्या रेकॉर्डिंबद्दल समाधानी नाही. ही गाणी पुन्हा नव्याने रेकॉर्ड केली जावीत, अशी तिची इच्छा आहे. मात्र फरहानने यास स्पष्ट नकार दिला आहे. गाणी जशी आहेत, तशीच राहू द्यायची, यावर तो ठाम आहे. यामुळे श्रद्धा दुखावली गेली आहे. आता श्रद्धाची ही नाराजी किती काळ टिकते, ते बघूच!