मादाम तुसाँदमधील एसआरकेच्या पुतळ्याला ‘फॅन’चा लूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2016 17:41 IST2016-04-08T00:41:29+5:302016-04-07T17:41:29+5:30
लंडनस्थित मादाम तुसाँद या जगप्रसिद्ध संग्रहालयातील किंगखान शाहरूख खान याच्या मेणाच्या पुतळ्याला नवे रूप मिळणार आहे. शाहरूखच्या या संग्रहालयातील ...
.jpg)
मादाम तुसाँदमधील एसआरकेच्या पुतळ्याला ‘फॅन’चा लूक
ल डनस्थित मादाम तुसाँद या जगप्रसिद्ध संग्रहालयातील किंगखान शाहरूख खान याच्या मेणाच्या पुतळ्याला नवे रूप मिळणार आहे. शाहरूखच्या या संग्रहालयातील मेणाच्या पुतळ्याला त्याच्या आगामी ‘फॅन’ या चित्रपटातील गौरव या व्यक्तिरेखेचे लूक देण्यात येणार आहे. हा चित्रपटाच्या प्रमोशनचाच एक भाग आहे, हे सांगायला नकोच. यश राज यांच्या आगामी ‘फॅन’ या चित्रपटात शाहरूख दुहेरी भूमिका साकारत आहे. एक सुपरस्टार आर्यन खन्ना याची तर दुसरी आर्यनचा सर्वात मोठा चाहता गौरव याची. मादाम तुसाँदमधील शाहरूखच्या मेणाच्या पुतळ्याला याच गौरवच्या वेशभूषेत नवे रूप दिले जाईल. वायआरएफ इंटरनॅशनलचे उपाध्यक्ष अवतार पानेसर यांनी आज ही माहिती दिली. मादाम तुसाँदमधील शाहरूखचा पुतळा त्याच्याच आगामी चित्रपटातील एका व्यक्तिरेखेतील नवीन लूक दिसणार आहे. यामुळे शाहरूखचे चाहते नक्की आनंदी होतील, असे ते म्हणाले. येत्या १५ एप्रिलला हा चित्रपट रिलीज होत आहे.