प्रसिद्ध दिग्दर्शक कुंदन शहा यांचं निधन,'जाने भी दो यारो'मुळे मिळाली लोकप्रियता
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2017 13:09 IST2017-10-07T07:15:49+5:302017-10-07T13:09:06+5:30
बॉलिवूडचे प्रसिध्द दिग्दर्शक कुंदन शहा यांचं मुंबईत हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालंय. ते 69 वर्षाचे होते.अनेक हिंदी सिनेमांसह त्यांनी टीव्ही ...

प्रसिद्ध दिग्दर्शक कुंदन शहा यांचं निधन,'जाने भी दो यारो'मुळे मिळाली लोकप्रियता
ब लिवूडचे प्रसिध्द दिग्दर्शक कुंदन शहा यांचं मुंबईत हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालंय. ते 69 वर्षाचे होते.अनेक हिंदी सिनेमांसह त्यांनी टीव्ही मालिकांचेही दिग्दर्शन केले होते. कुंदन शहा यांनी दिग्दर्शित केलेला 'जाने भी दो यारो' हा सिनेमा सुपरहिट ठरला. याशिवाय कभी हा कभी ना, क्या कहेना, दिल है तुम्हारा यासारखे अनेक सुपरहिट सिनेमा त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीला दिले. मात्र त्यांनी दिग्दर्शित केलेला जाने भी दो यारो हा सिनेमा विशेष गाजला. याच सिनेमामुळे त्यांची चित्रपटसृष्टीत वेगळी ओळख निर्माण झाली. तसेच सिनेमांसह छोट्या पडद्यावरही त्यांनी आपली छाप पाडली होती. नुक्कड आणि वागले की दुनिया या मालिकाही विशेष गाजल्या. कुंदन शहा यांच्या निधनाचं वृत्त समजताच चित्रपटसृष्टीतील मान्यवर त्यांच्या घरी येण्यास सुरुवात झाली आहे. त्यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. अनेक कलाकारांनी ट्विट करत कुंदन शहा यांना श्रध्दांजली वाहिली आहे.
![]()