प्रसिद्ध अभिनेते अमृत पाल यांचे निधन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2017 15:51 IST2017-06-20T10:21:41+5:302017-06-20T15:51:41+5:30

बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते अमृत पाल (७६) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे. त्यांच्या मुलाने याबाबतची अधिकृत माहिती दिली आहे. ...

Famous actor Amrit Pal dies | प्रसिद्ध अभिनेते अमृत पाल यांचे निधन!

प्रसिद्ध अभिनेते अमृत पाल यांचे निधन!

लिवूडचे प्रसिद्ध अभिनेते अमृत पाल (७६) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे. त्यांच्या मुलाने याबाबतची अधिकृत माहिती दिली आहे. अमृत पाल यांच्या गेल्या काही दिवसांपासून दीर्घ आजारामुळे प्रकृती खालावली होती. काल सायंकाळी ५ वाजेच्या सुमारात त्यांनी अंतिम श्वास घेतला. अमृत पाल यांनी शंभरपेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. 

८० आणि ९० च्या दशकात विनोद खन्ना, अनिल कपूर, धर्मेंद्र यांसारख्या सुपरस्टारसोबत काम करताना त्यांनी ‘कसम’, ‘प्यार के दो पल’ आणि ‘फरिश्ते’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांच्या निधनाची माहिती देताना अमृत पाल यांच्या मुलाने सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून ते व्यवस्थितरीत्या चालत नव्हते वा त्यांना व्यवस्थित बसताही येत नव्हते. आजारपणामुळेच त्यांनी चित्रपटांपासून दुरावा निर्माण केला होता.  

अमृत यांना निगेटिव्ह भूमिकेसाठी ओळखले जात होते. ‘प्यार के दो पल’ या चित्रपटात त्यांच्या निगेटीव्ह भूमिकेचे सर्वत्र कौतुक केले गेले होते. निगेटिव्ह भूमिका साकारूनदेखील त्यांनी प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले होते. या चित्रपटात ते पूनम ढिल्लो आणि मिथुन चक्रवर्ती यांच्यासोबत झळकले होते. 

दरम्यान, अमृत पाल यांच्या निधनामुळे इंडस्ट्रीत हळहळ व्यक्त केली जात आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच अभिनेते विनोद खन्ना, ओम पुरी यांच्या निधनामुळे बॉलिवूडला धक्का बसला होता. आता अमृत पाल यांच्या निधनामुळेही इंडस्ट्री सुन्न झाली आहे. त्यांना सर्व स्तरातून श्रद्धांजली अर्पण केली जात आहे. 

Web Title: Famous actor Amrit Pal dies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.