फवाद म्हणतो, ‘पीके’चा प्रस्ताव मीच नाकारला
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2016 11:24 IST2016-03-13T18:24:40+5:302016-03-13T11:24:40+5:30
‘खूबसूरत’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणारा पाकिस्तानी अभिनेता फवाद खान याला ‘पीके’ची आॅफर मिळाली होती म्हणे!! अहो, कुणी ...
.jpg)
फवाद म्हणतो, ‘पीके’चा प्रस्ताव मीच नाकारला
‘खूबसूरत’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणारा पाकिस्तानी अभिनेता फवाद खान याला ‘पीके’ची आॅफर मिळाली होती म्हणे!! अहो, कुणी काय, खुद्द फवादनेच हे सांगितलेयं. माझ्याकडे ‘पीके’चा प्रस्ताव आला तेव्हा मला आश्चर्याचा धक्काच बसला. कारण ही माझ्यासाठी सुवर्णसंधी होती. पण दुर्दैवाने मी हा प्रस्ताव स्वीकारू शकलो नाही. कारण मी आधीच ‘कपूर अॅण्ड सन्स’साठी डेट्स दिल्या होत्या. त्यामुळे इच्छा असूनही हा प्रस्ताव मला नाकारावा लागला, असे फवादने सांगितले.
राजकुमार हिरानींच्या ‘पीके’मध्ये आमीर खान आणि अनुष्का शर्मा मुख्य भूमिकेत दिसले होते. फवादला ज्या भूमिकेची आॅफर मिळाली होती, ती नंतर सुशांतसिंह राजपूतने साकारली.