दिल्लीत मध्यरात्री अजय देवगणची धुलाई? जाणून घ्या व्हायरल व्हिडीओचे सत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2021 01:24 PM2021-03-29T13:24:07+5:302021-03-29T13:25:32+5:30

Fact Check : राजधानी दिल्लीत मध्यरात्री दोन गटांत झालेल्या भांडणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. कारणही खास आहे.

fact check is ajay devgan beaten up publicly know the truth behind this viral video | दिल्लीत मध्यरात्री अजय देवगणची धुलाई? जाणून घ्या व्हायरल व्हिडीओचे सत्य

दिल्लीत मध्यरात्री अजय देवगणची धुलाई? जाणून घ्या व्हायरल व्हिडीओचे सत्य

googlenewsNext
ठळक मुद्देएका युजरने हा व्हिडीओ शेअर केला आहे. यात पांढ-या रंगाची शर्ट घातलेल्या व्यक्तिची धुलाई होताना दिसतेय.

राजधानी दिल्लीत मध्यरात्री दोन गटांत झालेल्या भांडणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. कारणही खास आहे. कारण या व्हिडीओत ज्या व्यक्तिला चोप देण्यात येतोय, तो सुपरस्टार अजय देवगण असल्याचा दावा केला जातोय. सोशल मीडिया युजर्सच्या दाव्यानुसार, घटनेच्या वेळी अजय देवगण दारूच्या नशेत तर्र होता. कार पार्किंगवरून वाद सुरु झाला आणि बघता बघता हा वाद हाणामारीपर्यंत पोहोचला. अर्थात व्हिडीओ अजय देवगणचा चेहरा स्पष्ट दिसत नाहीये. व्हिडीओतील व्यक्तिची पर्सनॅलिटी अजयची मिळतीजुळती असल्याने चोप खाणारा तोच असल्याचा दावा केला जातोय.

एका युजरने हा व्हिडीओ शेअर केला आहे. यात पांढ-या रंगाची शर्ट घातलेल्या व्यक्तिची धुलाई होताना दिसतेय. हा व्हिडीओ पोस्ट करताना युजरने लिहिलेय, ‘हा अजय देवगण आहे की नाही, माहित नाही. पण लोकांमध्ये शेतकरी आंदोलनाचा राग पसरताना दिसतोय. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय आणि व्हिडीओतील व्यक्ती अजय देवगण असल्याचा दावा केला जातोय.’

काय आहे सत्य?
या व्हिडीओची पडताळणी केली असता, तो राजधानी दिल्लीस्थित इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय एअरपोर्टजवळच्या एअरोसिटीमधील असल्याचे कळतेय. पार्किंगवरून हा वाद झाला आणि दोन गट एकमेकांवर तुटून पडलेत. वाद इतका विकोपाला गेला की, अनेक लोकांनी एकाला पकडून त्याला बदडणे सुरु केले. व्हिडीओतील व्यक्ति अजय देवगण असल्याचे म्हटले जातेय. पण न्यूज 18 ने आपल्या वृत्तात केलेल्या दाव्यानुसार, या घटनेचा अजय देवगणशी काहीही संबंध नाही. घटनेनंतर पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.

Web Title: fact check is ajay devgan beaten up publicly know the truth behind this viral video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.