चेहरामोहरा एकसमान...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2017 18:17 IST2017-07-08T12:47:44+5:302017-07-08T18:17:44+5:30
अबोली कुलकर्णी दिशा पटानीच्या चाहत्यांनी सोशल मीडियावरील तिच्या एका फोटोची तुलना हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री पेनेलोप क्रूजशी केली. एवढेच नाही ...
.jpg)
चेहरामोहरा एकसमान...
दिशा पटानीच्या चाहत्यांनी सोशल मीडियावरील तिच्या एका फोटोची तुलना हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री पेनेलोप क्रूजशी केली. एवढेच नाही तर नेटिझन्सनी तिला ‘भारताची पेनेलोप क्रूज’ असा किताब देखील दिला. मग काय? दिशा पटानीला तर आकाशच ठेंगणं झालं. दिशा आणि पेनेलोप यांचा चेहरा, बॉडी लँग्वेज आणि हावभाव यात साम्य असल्याचं त्यांच्या फॅन्सचं म्हणणं आहे. बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांच्या व्यक्तिमत्त्वात असेच साम्य दिसून येते. अशा अभिनेत्रींचा आढावा घेऊया...
परिणीती चोप्रा-हरनीत सिंग
बॉलिवूडची चुलबुली गर्ल परिणीती चोप्रा हिने वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. बेधडक, बिनधास्त अशा व्यक्तिरेखा तिने साकारल्या आहेत. तिचा चेहरा, तिचं दिसणं हे हॉलिवूड अभिनेत्री हरनीत सिंग हिच्यासारखं असल्याची अनेकांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सोनाक्षी सिन्हा - प्रिया मुखर्जी
प्रिया मुखर्जी हिला छोट्या पडद्याकडून सध्या खूप आॅफर्स मिळत आहेत. लंडनस्थित प्रिया मुखर्जी हिची आई ही इटालियन वंशाची असून वडील भारतीय वंशाचे आहेत. सोनाक्षी आणि प्रिया या दोघींच्याही चेहऱ्यामध्ये खूप साम्य आहे.
अनुष्का शर्मा - नाझिया हसन
पाकिस्तानी गायिका नाझिया हसन ही हुबेहूब बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हिच्यासारखी दिसते. या दोघींच्या चेहऱ्यांमध्ये बरंचसं साम्य आहे. या दोघीही त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात खुप उत्कृष्ट कामगिरी करताना दिसत आहेत.
दिया मिर्झा-अॅनी हॅथवे
सौंदर्याच्या बाबतीत अव्वल असणारी अभिनेत्री म्हणजे दिया मिर्झा. बॉलिवूडमधील सर्वांत सुंदर दिसणाऱ्या अभिनेत्रींमध्ये तिचे नाव घेतले जाते. दियाची तुलना हॉलिवूड अभिनेत्री अॅनी हॅथवे हिच्यासोबत केली जाते.
करिना कपूर खान-पॅरिस हिल्टन
बेगम बेबो करिना कपूर खान हिच्यासारखं कुणीतरी दिसतं, हेच किती इंटरेस्टिंग वाटतंय. होय, अगदी खरंय. हॉलिवूड अभिनेत्री पॅरिस हिल्टन ही करिना कपूर खान हिच्यासारखी दिसते. दोघी जणीही अतिशय उत्कृष्ट अभिनेत्री असून त्यांचा कुणालाही हेवा वाटावा, असे त्यांचे काम आहे.
प्राची देसाई-इव्ह ह्यूसन
‘बॉलिवूडची क्यूट गर्ल’ प्राची देसाई आणि हॉलिवूडची इव्ह ह्यूसन या दोघींच्या दिसण्यामध्ये बरंचसं साम्य असल्याचं दिसून आलंय. त्यांच्या अभिनयातही खुप साम्य असल्याचं त्यांच्या फॅन्सचं म्हणणं आहे.