शाहरुखचे स्पष्टीकरण; ‘रईस’ हा पूर्णत: काल्पनिक चित्रपट
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2016 21:48 IST2016-12-13T21:48:42+5:302016-12-13T21:48:42+5:30
बालिवूडचा बादशाह शाहरुख खान याचा बहुप्रतिक्षित रईस हा चित्रपटा लवकरच प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट गुजरातमधील एका गुन्हेगारावर आधारित ...
.jpg)
शाहरुखचे स्पष्टीकरण; ‘रईस’ हा पूर्णत: काल्पनिक चित्रपट
शाहरुख खान, रितेश सिधवानी, फरहान अख्तर व दिग्दर्शक राहुल ढोलकिया यांनी एका संयुक्त निवेदनाद्वारे या चित्रपटाबद्दल स्पष्टीकरण दिले आहे. यानुसार, आम्ही रईसच्या ट्रेलरला मिळालेल्या सकारात्मक व उत्साहवर्धक प्रतिक्रियांमुळे आनंदी आहोत. चाहत्यांचे हे प्रेम चित्रपटाच्या प्रदर्शनापर्यंत कायम राहील अशी आशा आहे. काही मीडिया रिपोर्टस्नुसार रईस हा चित्रपट वास्तविक कथेवर आधारित असल्याचे सांगण्यात येत आहे. आम्ही हे स्पष्ट करू इच्छितो क ी, रईस या चित्रपटाची कथा शुद्ध कल्पना आहे. कोणत्याही जीवित अथवा मृत व्यक्तीवर हा आधारित नाही.
‘रईस’ हा चित्रपटात १९८० च्या दशकातील गुजरातच्या पाश्वभूमीवर आधारित असून यात एका दारू तस्काराचा व्यापार एक क ठोर पोलीस अधिकारी ध्वस्त करतो. या चित्रपटाची निर्मिती एक्सल एंटरटेनमेंट व रेड चिलीस एंटरटेनमेंट यांनी केली आहे. या चित्रपटात शाहरुख खान सोबतच नवाजुद्दीन सिद्दिकीची महत्त्वाची भूमिका आहे. या चित्रपटातून पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.
रईस हा चित्रपट २५ जानेवारी २०१७ रोजी हा चित्रपट रिलीज होणार असून गुजरातमधील गँगस्टर अब्दूल लतीफ यांच्यावर आधारित असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र त्यावर निर्मात्यांनी आपली बाजू मांडली आहे.