आदि करणार श्रद्धाला माफ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2016 04:37 IST2016-02-16T11:37:21+5:302016-02-16T04:37:21+5:30
माणसे भांडतात, रागावतात आणि पुन्हा एकत्र येतात. पण सध्या दिग्दर्शक आदित्य चोप्रा आणि श्रद्धा कपूर यांच्यात बिनसले आहे. आदित्य ...

आदि करणार श्रद्धाला माफ?
ाणसे भांडतात, रागावतात आणि पुन्हा एकत्र येतात. पण सध्या दिग्दर्शक आदित्य चोप्रा आणि श्रद्धा कपूर यांच्यात बिनसले आहे. आदित्य चोप्रा मात्र त्याबाबतीत फारच कडक स्वभावाचे आहेत. श्रद्धा कपूरने तर तिच्या करिअरच्या सुरूवातीलाच आदित्य चोप्रा सारख्या दिग्दर्शकासोबत पंगा घेतला आहे. तिच्या नावावर आदित्यने तीन चित्रपटांची कथा तयार केली होती. पण तिने मात्र चक्क चित्रपटांना नकार दिला. त्यामुळे त्या दोघांमध्ये शीतयुद्ध सुरू झाले आहे. सध्या श्रद्धा तिच्या करिअरच्या अत्युच्च उंचीवर आहे. ‘आशिकी २’ आणि ‘रॉक आॅन २’ मुळे खुप प्रसिद्धी आणि कौतुक तिचे झाले. पण आदित्य चोप्रा सारख्या दिग्दर्शकासोबत तिने मतभेद केले आहेत तिला त्याविषयी थोडा विचार करावा लागणार आहे.