Exclusive: का पळतोयं टायगर मीडियापासून दूर?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2016 22:33 IST2016-05-22T10:39:53+5:302016-05-22T22:33:33+5:30
‘बागी’च्या यशाची चव चाखत असलेला टायगर श्रॉफ सध्या मीडियापासून अक्षरश: दूर पळतोय. कदाचित यावर तुमचा विश्वास बसणार नाही. पण ...

Exclusive: का पळतोयं टायगर मीडियापासून दूर?
‘ ागी’च्या यशाची चव चाखत असलेला टायगर श्रॉफ सध्या मीडियापासून अक्षरश: दूर पळतोय. कदाचित यावर तुमचा विश्वास बसणार नाही. पण टायगर मीडियाच्या कॅमेºयांपासून दूर पळत असतांनाची काही छायाचित्रेच ‘सीएनएक्स डिजिटल डॉट कॉम’च्या हाती लागली आहेत. होय, टायगर पळतोय आणि त्याला गाठण्यासाठी मीडियाचे कॅमेरेही पळत सुटलेतं, असे चित्र येथील एका हॉटेलात दिसून आले. एका चॅरिटी लंचसाठी टायगर या हॉटेलात पोहोचला. टायगर मीडियाशी बोलणार नाही, असे आधीच सांगण्यात आले होते. चॅरिटी लंचला उणेपुरे दहा मिनिटं हजेरी लावल्यानंतर टायगर तेथून बाहेर पडता. याचदरम्यान काही पत्रकारांनी टायगरशी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र मीडियाशी बोलावे लागले असे दिसताच टायगर अचानक पळायला लागला. अक्षरश: हॉटेलच्या लॉबीकडे तो धावत सुटला..आता टायगरचे अशारितीने मीडियापासून दूर पळण्यामागचे कारण काय, हे तर त्यालाच ठाऊक़..पण टायगर बेबी, मीडियापासून दूर पळालास तर कसे भागणार?? तेव्हा जरा दमानं..!!
बघा: टायगर पुढे आणि मीडियाचे कॅमेºयामॅन टायगरच्या मागे...
![]()
कर्करोगाने पीडित १०० मुले आणि त्यांच्या पालकांसाठी मुंंबईच्या एका हॉटेलात चॅरिटी इव्हेंटचे आयोजन करण्यात आले होते. याच कार्यक्रमासाठी टायगर आला असता तो मीडियापासून दूर पळताना दिसला.
![]()
Shutterbugs images