"आता बस्स...सगळं असह्य झालंय"; सुशांत सिंगची 'ती' शेवटची तीन ट्विट, जी त्यानेच केली होती डिलीट?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2020 17:45 IST2020-06-16T17:43:06+5:302020-06-16T17:45:34+5:30
सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या करण्यापूर्वी तसेच त्याच्या मनात सुरू असलेली घालमेल त्याने या ट्विटच्या माध्यमातून व्यक्तही केली होती.

"आता बस्स...सगळं असह्य झालंय"; सुशांत सिंगची 'ती' शेवटची तीन ट्विट, जी त्यानेच केली होती डिलीट?
सुशांतच्या आत्महत्येचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. सध्याच्या घडीला त्याच्या आठवणींव्यतिरिक्त आणखी काहीही मागे उरलेलं नाही. एक अभिनेता म्हणून ज्याप्रमाणं त्याची आठवण काढली जात आहे, तसंच परखडपणे आपली मतं मांडणारा एक दिलखुलास व्यक्ती म्हणूनही सुशांत अनेकांच्या स्मरणात आहे. आता सुशांतच्या निधनानंतर वेगवेगळ्या गोष्टी समोर येत आहेत.
आजतकने दिलेल्या माहितीनुास निधनापूर्वी सुशांतने तीन ट्विट केल होते. या ट्विटमधून तो नैराश्याचा सामना करत असल्याचे स्पष्ट होत आहे. तसेच त्याच्या मनात सुरू असलेली घालमेल त्याने या ट्विटच्या माध्यमातून व्यक्तही केली होती. हे मी सगळे का लिहीतोय. माझे मलाच कळत नसल्याचे सांगत त्याने तीन ट्विट केले आणि हे ट्विट मी डिलीटदेखील करणार असल्याचेही त्याने सांगितले होते. निधनापूर्वीच तो काहीतरी असे पाऊल उचलणार असल्याचा संकेतच त्याने ट्विटमधून दिला होता.
सध्या त्याचे हे शेवटचे ट्विट सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. खरंच हे ट्विट सुशांतने त्याच्या निधनापूर्वीच केले होते का ? याबाबत कोणतीही अधिकृती माहिती अद्याप समोर आलेली नाही. तसेच आजतकने टाकलेली बातमीही त्यांनी नंतर डिलीट केली असल्याचेही निदर्शनास आली आहे.