कोणासोबत काम करून एव्हलिन शर्माचे स्वप्न झाले पूर्ण?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2016 02:19 PM2016-12-27T14:19:35+5:302016-12-27T14:19:35+5:30

जर्मन-भारतीय मॉडेल आणि अभिनेत्री एव्हलिन शर्माची लाईफ सध्या जोरदार सुरू आहे. बॉलीवूडची ही हॉट नटी इम्तियाज अली दिग्दर्शित ‘ ...

Everlin Sharma's dream to work with? | कोणासोबत काम करून एव्हलिन शर्माचे स्वप्न झाले पूर्ण?

कोणासोबत काम करून एव्हलिन शर्माचे स्वप्न झाले पूर्ण?

googlenewsNext
्मन-भारतीय मॉडेल आणि अभिनेत्री एव्हलिन शर्माची लाईफ सध्या जोरदार सुरू आहे. बॉलीवूडची ही हॉट नटी इम्तियाज अली दिग्दर्शित ‘द रिंग/रेहनुमा’ या चित्रपटात शाहरुखसोबत दिसणार आहे. त्याबरोबरच अमित साधसोबत एका रोमॅण्टिक कॉमेडी चित्रपटातही ती काम करतेय.

बॉलीवूडमध्ये सहा वर्षे पूर्ण करणारी एव्हलिन मुंबईला तिचे घरच मानते. मोठ्या-मोठ्या बॅनरच्या सिनेमांत काम करण्याची संधी मिळाल्याने ती स्वत:ला भाग्यवान मानते. ‘किंग खान’ शाहरुखसोबत सिनेमा करायला मिळाला आणि माझे स्वप्न पूर्ण झाल्याचे तिने सांगितले. 

ती म्हणाली की, ‘मी जर्मनीत वाढले आहे. तेथे लोकांना केवळ शाहरुख आणि ऐश्वर्या राय माहित आहेत. त्यामुळे त्याच्यासोबत स्क्रीन शेअर करायला मिळाली म्हणून माझे स्वप्न पूर्ण झाले. इम्तियाज अलीसारखा गुणी दिग्दर्शक तुम्हाला जर रोल आॅफर करीत असेल तर यापेक्षा अधिक काय पाहिजे?!’

रणबीर कपूरच्या ‘ये जवानी है दिवानी’मधील तिच्या भूमिकेमुळे ती प्रकाशझोतात आली. त्याविषयी ती सांगते की, ‘रणबीरच्या चार्मवर तर मी पूर्णपणे भाळलेली आहे. नव्या पीढीचा तो सर्वोत्तम अभिनेता आहे. तो एकदम सेक्सी, तरुण, मस्तीखोर आहे तर शाहरुख चार्मिंग आणि जेंटनमॅन आहे.’

Evelyn Sharma with Ranbir Kapoor in YJHD
ये जवानी है दिवानी : एव्हलिन शर्मा आणि रणबीर क पूर​

‘सीम्स फॉर ड्रीम्स’ नावाच्या तिच्या चॅरिटीद्वारे ती सामाजसेवासुद्धा करते. गरीब व गरजू लोकांना कपडे पुरवण्याचे काम या संस्थेमार्फत करण्यात येते. सेलिब्रेटींनी परिधान केलेल्या डिझायनर कपड्यांचा लिलाव करून सामाजिक संस्थांना आर्थिक मदत केली जाते. ‘सामान्य लोकसुद्धा कपडे दान देऊन किंवा लिलावात सहभागी होऊन आमच्या कामात सहभागी होऊ शकतात’, असे ती म्हणाली.

सुंदर मुलींना बॉलीवूडमध्ये लगेच काम मिळते असे तिला वाटत नाही. ती म्हणते, ‘केवळ सुंदर आहे म्हणून तुम्हाला संधी मिळत नाही. योग्य वेळी योग्य ठिकाणी असणे खूप महत्त्वाचे असते. मी कित्येक आॅडिशन्स दिलेल्या आहे. तेव्हा कुठे मला चांगले चित्रपट मिळाले. येथे प्रत्येकाला स्ट्रगल करावेच लागते.’

एव्हलिनची आई जर्मन आहे तर वडील पंजाबी. लहानपणी ती स्वत:ला स्पॅनिश/मेक्सिकन समजायची. तिच्या प्रवासाबद्दल बोलताना ती सांगते, ‘भारतीयांना मी विदेशी वाटते तर जर्मन लोकांना मी त्यांच्यातील नाही वाटत. माझी खरी ओळख काय हे शोधण्यात मला नेहमीच अडचणी येतात. भारतात आल्यावर मी हिंदी शिकले. तेव्हा मला माझे मूळ कळाले.’

Web Title: Everlin Sharma's dream to work with?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.