शाहरूख आजही स्वत:ला मानतो ‘न्यूकमर’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2016 18:13 IST2016-11-10T18:09:22+5:302016-11-10T18:13:57+5:30

शीर्षक वाचून गोंधळून जाऊ नका.. होय, पण हे खरंय की, बॉलिवूडचा ‘किंग’ शाहरूख खान आजही स्वत:ला या इंडस्ट्रीत‘न्यूकमर’च समजतो. ...

Even today, Sekhar believes himself 'Newcomer'! | शाहरूख आजही स्वत:ला मानतो ‘न्यूकमर’!

शाहरूख आजही स्वत:ला मानतो ‘न्यूकमर’!

र्षक वाचून गोंधळून जाऊ नका.. होय, पण हे खरंय की, बॉलिवूडचा ‘किंग’ शाहरूख खान आजही स्वत:ला या इंडस्ट्रीत‘न्यूकमर’च समजतो. त्याच्या मते,कला महत्त्वाची, कलाकार नव्हे. तो म्हणतो, कलाकार हा पाण्यासारखा असतो. त्याला केवळ पाण्याचा रंग आणि आकारच स्वत:मध्ये आत्मसात करून घ्यावा लागतो. मी  या शुद्ध विचारांसह काम करत राहिलो तरच रसिकांपुढे उत्तम कलाकृती सादर करू शकेन. माझ्यासाठी माझी कला महत्त्वाची व पूज्यनीय आहे.’ 

नुकत्याच पार पडलेल्या एका इव्हेंटमध्ये बोलताना त्याने त्याच्या आत्तापर्यंतच्या करिअरवर प्रकाश टाकला. स्वत:च्या स्ट्रगलिंग लाईफविषयी बोलताना तो म्हणाला,‘२५ वर्षांपूर्वी काही स्वप्नं उराशी बाळगून मी दिल्लीला आलो. बराच संघर्ष केला. त्याच संघर्षाने मला सुपरस्टार बनवल.  आज माझ स्वप्नं पूर्ण झालं. पण तरीही मी स्वत:ला बॉलिवूडमध्ये फ्रेशर, न्यूकमर मानतो. त्याकाळात मी एक सर्वसाधारण दिसणारा विचित्र असा तरूण होतो. मला फिल्मी बॅकग्राऊंड नव्हतं. मला खूप फास्ट बोलायची सवय होती. पण निर्माते आणि माझे दिग्दर्शक यांनी मला दिलेल्या संधीमुळे माझ्या करिअरला दिशा मिळाली. 

Web Title: Even today, Sekhar believes himself 'Newcomer'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.