दिग्दर्शकाने कट म्हटल्यानंतरही जॅकलिन फर्नांडिस आणि सिद्धार्थ मल्होत्रा करत राहिले किसिंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2017 11:45 IST2017-10-31T06:15:29+5:302017-10-31T11:45:29+5:30
जॅकलिन फर्नांडिस आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या जोडीचा अ जेन्टलमन हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या चित्रपटाला बॉक्स ...

दिग्दर्शकाने कट म्हटल्यानंतरही जॅकलिन फर्नांडिस आणि सिद्धार्थ मल्होत्रा करत राहिले किसिंग
ज कलिन फर्नांडिस आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या जोडीचा अ जेन्टलमन हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगले कलेक्शन करता आले नव्हते. पण या चित्रपटातील सिद्धार्थ आणि जॅकलिनच्या केमिस्ट्रीची चांगलीच चर्चा झाली होती. या दोघांची केमिस्ट्री खूपच छान जुळून आली होती. या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी त्या दोघांमध्ये खूपच चांगली मैत्री देखील झाली होती. एवढेच नव्हे तर यांचे नाते मैत्रीच्या पलीकडे गेले असल्याचे अनेक वर्तमानपत्रांनी म्हटले होते. सिद्धार्थ आणि आलिया भट्ट यांचे ब्रेकअप झाले असून या ब्रेकअपसाठी एक अभिनेत्री जबाबदार असल्याचे म्हटले जात आहे. सिद्धार्थ आणि त्या अभिनेत्रीमध्ये निर्माण झालेल्या जवळीकतेमुळे सिद्धार्थ आणि आलिया यांचे ब्रेकअप झाले असल्याची चर्चा आहे. सिद्धार्थ गेल्या काही दिवसांपासून आलिया पेक्षा जॅकलिन फर्नांडिससोबत जास्त दिसत आहे. जेन्टलमन या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या दरम्यान तर एक खूपच छान किस्सा घडला होता. याची सगळीकडेच चांगलीच चर्चा झाली होती.
![jacqueline fernandez sidharth malhotra]()
अ जेन्टलमन या चित्रपटात प्रेक्षकांना अनेक इंटिमेंट सीन पाहायला मिळाले होते. हे इंटिमेट सीन चित्रीत करत असताना एक वेगळीच गोष्ट घडली होती आणि या गोष्टीची सगळीकडेच चर्चा झाली होती. या चित्रपटातील इंटिमेट सीन चित्रीत करताना सिद्धार्थ आणि जॅकलिन त्या सीनमध्ये इतके इन्वोल्व्ह झाले होते की, दिग्दर्शकाने कट म्हणून देखील ते एकमेकांना किस करतच होते. त्यांचे हे रूप पाहून सेटवरील सगळ्यांना चांगलाच धक्का बसला असल्याचे म्हटले जाते. काहीच वेळात दोघांच्याही गोष्ट चांगलीच लक्षात आली होती.
अ जेन्टलमन या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान झालेल्या या गोष्टीमुळे तर यांच्या अफेअरविषयी चांगलीच चर्चा रंगली होती. तसेच सिद्धार्थ हा मुळचा दिल्लीचा आहे. तो या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान जॅकलिनला त्याच्या घरी दिल्लीला डिनरसाठी घेऊन गेला होता. त्याने आपल्या पालकांना तिला भेटवले. तसेच त्याच्या जवळच्या मित्रांना देखील भेटवले. त्यामुळे दाल में कुछ काला है अशीच चर्चा सगळीकडे चालू होती.
Also Read : सिद्धार्थ मल्होत्राने का भेटवले जॅकलिन फर्नांडिसला आपल्या पालकांना?