हाय गर्मी...! ईशा गुप्ताचा हा बाथटब व्हिडीओ पाहून व्हाल खल्लास

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2020 11:36 AM2020-03-19T11:36:27+5:302020-03-19T11:36:37+5:30

हॉट आणि ग्लॅमरस...व्हिडीओ व्हायरल...

esha gupta shares a teaser of her upcoming photoshoot in bathtub video viral on social media-ram | हाय गर्मी...! ईशा गुप्ताचा हा बाथटब व्हिडीओ पाहून व्हाल खल्लास

हाय गर्मी...! ईशा गुप्ताचा हा बाथटब व्हिडीओ पाहून व्हाल खल्लास

googlenewsNext
ठळक मुद्देइमरान हाश्मीसोबत ईशा गुप्ताने ‘जन्नत 2’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले

बॉलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ता चित्रपटात दिसली नसली तरी सतत चर्चेत असते. होय, चित्रपट नसले तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून चर्चेत राहण्याची कला ईशाला चांगलीच अवगत आहे. यासाठी स्वत:चे हॉट फोटो व व्हिडीओ ती शेअर करत असते. सध्या ईशाचा एक बाथटब व्हिडीओ असाच चर्चेत आहे. होय, तिचा हा व्हिडीओ सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालतोय.
 ईशाने खुद्द हा व्हिडीओ शेअर केला. हा व्हिडीओ खरे तर एका शूटींगदरम्यानचा आहे. यात ईशा बाथटबमध्ये पोज देताना दिसतेय. सुरुवातीला ती बाथटमध्ये पाण्यात झोपलेली दिसते. त्यानंतर ती पाण्यातून बाहेर पडते आणि पोज देते. या व्हिडीओमध्ये ईशा खूपच हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे. इतकी की, तुमची तिच्यावरची नजर हटणार नाही.


आत्तापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. हॉट, हाय गर्मी... अशा अनेक प्रतिक्रिया चाहत्यांनी यावर दिल्या आहेत.


 
 ईशाला बॉलिवूडची ‘अँजेलिना जॉली’ म्हटले जाते. 2007 मध्ये मिस इंडिया इंटरनॅशनल हा किताब आपल्या नावावर करणारी ईशा बॉलिवूडची बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.
 


इमरान हाश्मीसोबत ईशा गुप्ताने ‘जन्नत 2’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात ती इमरान हाश्मीच्या अपोझिट दिसली होती. 

ईशा बॉलिवूडमध्ये  बेबी,  रुस्तम  व  बादशाहो, कमांडो, चक्रव्यूह सारख्या चित्रपटात झळकली आहे. शेवटची ईशा ‘टोटल धमाल’ चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात तिच्यासोबत अजय देवगण, अनिल कपूर व माधुरी दीक्षित मुख्य भूमिकेत होते. बॉक्स आॅफिसवर या सिनेमा चांगला गल्ला जमावला होता.  

Web Title: esha gupta shares a teaser of her upcoming photoshoot in bathtub video viral on social media-ram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.