2020 वर्षाच्या शेवटच्या दिवशी इशा गुप्ताने शेअर केला हॉट फोटो, सोशल मीडियावर धुमाकूळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2020 16:25 IST2020-12-31T16:19:07+5:302020-12-31T16:25:03+5:30
मध्यंतरी इशाने थेट बाथरुममधला सेल्फी फोटो शेअर केला होता. बाथरुममधील या सेल्फीमुळे ती प्रचंड चर्चेत होती. लॉकडाउनच्या काळात देखिल आपल्या चाहत्यांसाठी विविध फोटो शेअर करत होती.

2020 वर्षाच्या शेवटच्या दिवशी इशा गुप्ताने शेअर केला हॉट फोटो, सोशल मीडियावर धुमाकूळ
२०२० या वर्षाला बाय बाय करत सारेच मोठ्या आनंदाने आणि उत्साहात नववर्षाचे स्वागत करण्याच्या तयारीत आहेत. नवे वर्ष अधिक चांगलं कसं जाईल याचे संकल्प प्रत्येकाने केले आहेत. प्रत्येकाचा नवीन वर्षाचा काही ना काही संकल्प असतो.
असाच काहीसा संकल्प आता अभिनेत्री इशा गुप्तानेही केले आहे. या वर्षाला बाय बाय करत तिने नवीन बॅकलेस फोटो शेअर केला आहे. शेअर केलेल्या फोटोमध्ये रिया बेडवर बसून आपली बॉडी फ्लॉन्ट करताना दिसत आहे. या फोटोला तिने समर्पक असे कॅप्शनही दिले आहे बाय बाय २०२० असे म्हणत तिने हा फोटो शेअर केला आहे.
वर्षाच्या शेवटच्या दिवशी शेवटचा हॉट अंदाजातील फोटो शेअर करत तिने चाहत्यांचेही लक्ष वेधून घेत आहे. नवीन वर्षांत काही तरी हटके धमाकेदार इशा करणार असल्याचे या फोटोमुळे तर्क वितर्क लावले जा आहेत. इशाने हॉट अंदाजत फोटो शेअर करण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीय. या आधीही तिने अशा प्रकारचे फोटो शेअर करत लक्ष वेधून घेतले होते.
तिच्या या फोटोंमुळे अनेकदा तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. त्याचबरोबर अनेकांनी तिच्यावर टीका देखील केली होती. त्यानंतर तिने हे फोटो सोशल मीडियावरून हटवले देखील होते. मात्र आता इशा ट्रोलिंगचाही फारसा फरक पडत नसल्याचे वाटते. पुन्हा एकदा तिने फोटो शेअर करण्याचे धाडस दाखवले आहे.
तिच्या इन्स्टाग्रामर नजर टाकल्यास तुम्हाला तिचे विविध अंदाजातील फोटो पाहायला मिळतील. त्यामुळेच दिवसेंदिवस सोशल मीडियावर तिच्या फॉलोअर्सच्या संख्येतही वाढ होत आहे.
मध्यंतरी इशाने थेट बाथरुममधला सेल्फी फोटो शेअर केला होता. बाथरुममधील या सेल्फीमुळे ती प्रचंड चर्चेत होती. लॉकडाउनच्या काळात देखिल आपल्या चाहत्यांसाठी विविध फोटो शेअर करत होती. यादरम्यान तिने आपले अनेक अनुभव देखील एका व्हिडिओच्या माध्यमातून शेअर केले होते. त्याचबरोबर फिटनेसच्या टीप्सही देताना दिसली होती.