अखेर चार वर्षांनंतर प्रदर्शित होतोय इमरान हाश्मीचा ‘हा’ चित्रपट !
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2018 16:05 IST2018-11-08T16:00:06+5:302018-11-08T16:05:29+5:30
इमरान हाश्मीच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. होय, अनेक वर्षे प्रदर्शित न होऊ शकलेला इमरानचा एक चित्रपट अखेर प्रदर्शित होत आहे.

अखेर चार वर्षांनंतर प्रदर्शित होतोय इमरान हाश्मीचा ‘हा’ चित्रपट !
इमरान हाश्मीच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. होय, अनेक वर्षे प्रदर्शित न होऊ शकलेला इमरानचा एक चित्रपट अखेर प्रदर्शित होत आहे. बॉलिवूडमध्ये सीरिअल किसर नावाने ओळखल्या जाणाऱ्या इमरानच्या चित्रपटात अनेक बोल्ड सीन्स असतात. या चित्रपटातही असेच काही बोल्ड सीन्स असणार आणि यामुळे त्यावर बंदी घातली गेली असावी, असे तुम्हाला वाटत असेल तर तसे अजिबात नाही. या चित्रपटात बोल्ड सीन्स तर नाही पण हा चित्रपट एका बोल्ड विषयावर आधारित आहे. होय, या चित्रपटात इमराने एका पाकिस्तानीची भूमिका साकारली आहे. त्यामुळे हा चित्रपट भारतात प्रदर्शित होऊ शकला नव्हता. या चित्रपटाचे नाव आहे, ‘टायगर्स’. हा चित्रपट आता डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होतो आहे. ‘झी5’ वर येत्या २१ नोव्हेंबरला हा चित्रपट रिलीज होतो आहे. आॅस्कर विजेते दिग्दर्शत डेनिस तानोविक यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. डेनिस यांच्या ‘नो मेन्स लँड’ या चित्रपटाने आॅस्कर पटकावला होता.
‘टायगर्स’ या चित्रपटात इमराने पाकिस्तानी सेल्समॅनची भूमिका साकारली आहे.‘वन फॅमिली रिस्क एव्हरिथिंग फॉर द ट्रुथ’ अशी टॅगलाईन असलेल्या या चित्रपटात इमरान सत्यासाठी लढताना दिसेल. इमरानशिवाय आदिल हुसैन, सुप्रिया पाठक , सत्यदीप मिश्रा यात महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत.
२०१४ मध्ये या चित्रपटाचे शूटींग झाले होते. अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या चित्रपटाने प्रशंसा मिळवली. पण चित्रपटाचा विषय एकदम बोल्ड असल्याने हा सिनेमा भारतात प्रदर्शित होऊ शकला नव्हता. पण आता डिजिटल प्लॅटफॉर्मवर का होईना इमरानच्या चाहत्यांना तो पाहता येणार आहे.