रणबीर कपूरची उद्या ईडी चौकशी; हवाला रॅकेटमुळे ईडीच्या रडारवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2023 05:25 IST2023-10-05T05:22:45+5:302023-10-05T05:25:00+5:30
६ ऑक्टोबर रोजी ईडीचे अधिकारी चौकशी करणार आहेत.

रणबीर कपूरची उद्या ईडी चौकशी; हवाला रॅकेटमुळे ईडीच्या रडारवर
मुंबई : ऑनलाइन सट्टेबाजी ॲपच्या माध्यमातून सुमारे पाच हजार कोटी रुपयांच्या हवाला रॅकेटमुळे ईडीच्या रडारवर आलेल्या महादेव ॲपप्रकरणी अभिनेता रणबीर कपूर याची उद्या, शुक्रवारी, ६ ऑक्टोबर रोजी ईडीचे अधिकारी चौकशी करणार आहेत.
महादेव ॲप कंपनीच्या उपकंपनीच्या एका ॲपचे प्रमोशन रणबीर याने केले होते व त्यासाठी त्याने रोखीने मानधन स्वीकारल्याचा ठपका ईडीने ठेवला असून, त्यासाठी त्याची चौकशी होणार आहे. महादेव ॲप कंपनीचे हवाला रॅकेट उजेडात आल्यानंतर ईडीने कंपनीच्या संचालकांविरोधात मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला होता. या ॲपच्या प्रमोशनमध्ये बॉलिवूडमधील अनेक कलाकार गुंतल्याची माहिती पुढे आली होती.