या चित्रपटाची कथा ऐकून भावूक झाला संजय दत्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2017 18:01 IST2017-06-16T10:09:22+5:302017-06-16T18:01:28+5:30
संजय दत्तच्या चित्रपटाची भूमीची वाट त्याचे फॅन्स खूप दिवसांपासून बघतायेत. संजय दत्त एक मोठ्या ब्रेकनंतर मोठ्या पडद्यावर झळकण्यास तयार ...

या चित्रपटाची कथा ऐकून भावूक झाला संजय दत्त
स जय दत्तच्या चित्रपटाची भूमीची वाट त्याचे फॅन्स खूप दिवसांपासून बघतायेत. संजय दत्त एक मोठ्या ब्रेकनंतर मोठ्या पडद्यावर झळकण्यास तयार आहेत. ज्यावेळी भूमी चित्रपटाची कथा लेखक राज शांडिल्याने संजय दत्तला ऐकवली त्यावेळी संजय दत्तला या चित्रपटाची कथा ऐवढी आवडली की त्याच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले आणि त्यांने राजला मीठी मारली. या चित्रपटाची कथा लिहिण्यासाठी राज शांडिल्या यांनी दिवसातले 15-15 तास काम करुन 2 महिन्यात या चित्रपटाची कथा पूर्ण केली आहे. लेखकांने संजय दत्त एक खूप चांगला माणूस असल्याचे त्यांने सांगितले आहे. चित्रपटची कथा दिग्दर्शक आणि निर्मात्याला खूप आवडली आहे. राज शांडिल्य याच्या नावावर लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये सगळ्यात जास्त कथा लिहिण्याचा रेकॉर्ड आहे. राजाने अजूनपर्यंत कॉमेडी प्रकारच्या कथा जास्त लिहिल्या आहेत. पुढच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. वडील-मुलीच्या नात्यावर या चित्रपटातून भाष्य करण्यात आले आहे. वडिलांची भूमिका संजय दत्त साकारत आहे तर मुलीच्या भूमिकेत अदिती राव हैदरी दिसणार आहे. विधु विनोद चोप्रा, सिद्धार्थ आनंद यांच्यादेखील या चित्रपटात भूमिका आहेत. याचित्रपटाचे दिग्दर्शन ओमंग कुमार करत आहेत. भूषण कुमार, संदीप सिंह आणि ओमंग कुमार मिळून याचित्रपटाची निर्मिती करत आहे. या चित्रपट काम करण्याचा अनुभव खूपच वेगळा असल्याचे अदितीने सांगितले. याचित्रपटाचे शूटिंग मे महिन्यातच पूर्ण होणार होते असे कळतेय. संजय दत्तचे फॅन्स आपल्या लाडक्या अभिनेत्याला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी नक्कीच उत्सुक असतील.