​‘या’ कारणामुळे कमला दास बनण्यास विद्याने दिला नकार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2017 13:12 IST2017-01-12T13:12:16+5:302017-01-12T13:12:16+5:30

वादग्रस्त लेखिका कमला दास यांच्या आयुष्यावर बेतलेल्या बायोपिकमध्ये अभिनेत्री विद्या बालन मध्यवर्ती भूमिका साकारणार होती. होती, यासाठी कारण आता ...

Due to this 'reason', why did not the student become a Kamala slavery? | ​‘या’ कारणामुळे कमला दास बनण्यास विद्याने दिला नकार?

​‘या’ कारणामुळे कमला दास बनण्यास विद्याने दिला नकार?

दग्रस्त लेखिका कमला दास यांच्या आयुष्यावर बेतलेल्या बायोपिकमध्ये अभिनेत्री विद्या बालन मध्यवर्ती भूमिका साकारणार होती. होती, यासाठी कारण आता विद्या या चित्रपटाचा भाग नसणार आहे. होय, विद्याने या चित्रपटातून अंग काढून घेतल्याची खबर आहे. हिंदू संघटनांच्या विरोध टाळण्यासाठी विद्याने ऐनवेळी या चित्रपटाला नकार दिल्याचे मानले जात आहे.

 बंडखोर लेखिका आणि कवयित्री अशी कमला दास यांची ओळख आहे. २००९ कमला दास यांचे निधन झाले. आयुष्याच्या अखेरच्या काळात त्यांनी मुस्लिम धर्म स्वीकारत आपले नाव कमला सुरैय्या असे ठेवले होते. कमाल नावाने ओळखले जाणारे दिग्दर्शक कमालुद्दीन मुहम्मद हे कमला दास यांच्या आयुष्यावर चित्रपट बनवत आहे. या चित्रपटात कमला यांच्या भूमिकेसाठी विद्याची निवड झाली होती. कमाल यांनी याबद्दल सांगितले की, आधी विद्या या रोलसाठी अतिशय उत्सूक होती. कमला यांचे साहित्य वाचून ती कमालीची प्रभावित झाली होती. मात्र यानंतर विद्याने चित्रपटाच्या शूटींग शेड्यूलमध्ये बदल केले. चित्रपटाच्या टायटलवरही तिने आक्षेप नोंदवला. यानंतर मी विद्याच्या मॅनेजरशी संपर्क साधला. पण त्याच्याकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही. यानंतर विद्याच्या अधिकृत प्रवक्त्याने विद्या हा चित्रपट सोडत असल्याचे सांगितले. चित्रपटाबद्दल तुमच्या व विद्याचे विचार भिन्न आहेत, असे त्याने मला सांगितले. कदाचित कट्टर हिंदूत्ववादी संघटनांनी चालवलेल्या विरोधामुळे विद्याने हा चित्रपट सोडला असावा, असे संकेतही कमाल यांनी यावेळी दिली. कमला दास यांच्या बायोपिकमध्ये विद्याने काम करू नये, असा सूर अनेक कट्टर हिंदूत्ववादी संघटनांनी आवळला होता.

केरळ येथे जन्मलेल्या कमला दास यांनी महिलांची लैंगिकता या विषयावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.  यामुळे त्या काळात बरेच वादही निर्माण झाले होते. प्रस्थापित व्यवस्थेला धक्का देण्याचे काम कमला दास यांनी केले. त्यावेळी त्यांच्यावर बरीच टीकाही झाली. त्यांच्या साहित्याचे फ्रेंच, स्पॅनिश, रशियन, जर्मन आणि जपानी भाषेमध्येही अनुवाद करण्यात आले आहे. प्रतिष्ठेच्या नोबल पुरस्कार साहित्य विभागासाठीही त्यांना १९८४ रोजी नामांकन मिळाले होते.
 
 

Web Title: Due to this 'reason', why did not the student become a Kamala slavery?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.